देशात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. रोज लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. माहामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात अनेक ठिकाणी लॉकडाऊन लावण्यात आलं आहे. तरीही लोक लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्यास तयार नाहीत. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मोठ्या प्रमाणात संकटांचा सामना करावा लागत आहे.
लोकांच्या निष्काळजीपणामुळे मोठं नुकसान झाल्याची घटना राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातून समोर आली आहे. जिल्ह्यातील खीरवा गावात कोरोनामुळे मृत झालेल्या एका व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी जवळपास १५० लोकांनी गर्दी केली. आता २१ दिवसांच्या आत जवळपास २१ लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला आहे.
राजस्थानात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. राज्यातील सीकर जिल्ह्यातील लक्ष्मणगड तहसीलच्या खीरवा गावात गेल्या २१ दिवसांत २१ हून अधिक लोकांच्या मृत्यूमुळे लोक घाबरले आहेत. यानंतर राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांची पथके खेराव गावात पोहोचली आहेत. तथापि, अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की एप्रिल ते मे दरम्यान गावात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे केवळ चार मृत्यू झाले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार खीरवा गावात कोरोना संक्रमणामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर अंत्ययात्रेसाठी जवळपास १५० लोक जमा झाले. यादरम्यान कोरोना प्रोटोकॉल्सचे पालन करण्यात आलं नाही. या माणसाला ज्या प्लास्टीकच्या पिशवीत आणलं होतं. त्यावेळी अनेकांनी स्पर्शदेखील केला.
अरे व्वा! टेक महिंद्रानं विकसित केलं कोरोनाचा खात्मा करणारं औषध; लवकरच पेटंट मिळणार
लक्ष्मणगडचे अधिकारी कलराज मीणा यांनी सांगितले की, ''२१ पैकी फक्त ४ लोकांचा मृत्यू कोरोना संक्रमणामुळे झाला आहे. मृतांमध्ये जास्त वयाच्या लोकांचा समावेश आहे. तरीसुद्धा आम्ही ज्या कुटुंबातील लोक वारले आहेत. त्यांच्या १४७ नमुने घेतले आहेत. जेणेकरून कोरोना व्हायरसचं सामुदायिक संक्रमण झालं आहे की नाही याबबत माहिती मिळवता येऊ शकेल. ''
कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास चुकूनही करू नका CT-SCAN; एम्स संचालकांचा धोक्याचा इशारा
प्रशासनाकडून गावाला कोरोनामुक्त बनवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. लोकांच्या आजारपणाबाबत माहिती घेऊन त्यांना सहकार्य केलं आहे. याबाबत सीकरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय चौधरी यांनी सांगितले की, या संदर्भात स्थानिक संघाकडून अहवाल मागविण्यात आला आहे. अहवाल मिळाल्यानंतरच माहिती देता येऊ शकते.