शहरं
Join us  
Trending Stories
1
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : योगायोग! उद्या निकाल लागणार, त्याच वेळी पहाटेच्या शपथविधीला पाच वर्ष पूर्ण होणार
3
Maharashtra Vidhan Sabha Results 2024: मुंबईतील 36 मतदारसंघांची  ‘येथे’ होणार मतमोजणी
4
'या' मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांचं पारडं जड, सत्तास्थापनेत किंगमेकरही ठरणार?
5
तुमचं Aadhaar कार्ड हरवलंय, आणि नंबरही लक्षात नाहीये; आता काय करावं लागेल? जाणून घ्या 
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: मुंबईतील २४ मतदारसंघांत महिलांचा 'मत'टक्का पुरुषांपेक्षा जास्त! 
7
छगन भुजबळ आणि माणिकराव शिंदे यांच्यात 'कांटे की टक्कर'; विक्रमी मतांचा फायदा कुणाला होणार?
8
दिंडोरीत पुन्हा घड्याळाची टिकटिक, की वाजणार तुतारी?
9
IND vs AUS : KL राहुलच्या विकेटसह पडली वादाची ठिणगी; खरंच चिटिंग झाली? (VIDEO)
10
Kalbhairav Jayanti 2024: शनिवारी चुकवू नका काल भैरवाची 'ही' उपासना; मिळेल सुख, दूर होईल निराशा!
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
12
Video - नवरा-नवरीला गिफ्ट द्यायला आला अन् खाली कोसळला; स्टेजवरच हार्ट अटॅकने मृत्यू
13
ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देणाऱ्या हिना खानचं टीव्हीवर कमबॅक, Bigg Boss 18 मध्ये दिसणार
14
केवायसी नाही म्हणून खाते फ्रीझ करू नका! आरबीआयने सर्व बँकांना खडसावले
15
मुंबईत मतमोजणीची तयारी पूर्ण; २,७०० हून अधिक कर्मचारी, १० हजार पोलीस तैनात
16
करमाळ्यात कुर्डूवाडीसह ३६ गावे ठरणार गेमचेंजर; 'हा' फॅक्टर निर्णायक राहणार!
17
Adani Group Stocks: आरोपांनंतर अदानी समूहाचे शेअर्स आजही गडगडले; 'या' कंपनीला सर्वाधिक फटका
18
अभिनयक्षेत्रातून निवृत्ती घेणार का? अनिल कपूरला नाना पाटेकर म्हणाले- "माझ्याकडे काम नसेल तर..."
19
कोहलीचा 'विराट' संघर्ष कायम! हेजलवूडच्या अतिरिक्त उसळी घेणाऱ्या चेंडूवर 'किंग'ची झाली 'शेळी'
20
तेराव्या वर्षी सेल्समन म्हणून काम, आईकडून १० हजार घेऊन सुरू केला व्यवसाय, उभारला ३३ हजार कोटींचा ब्रँड

CoronaVirus News: डेक्झामिथॅझोन म्हणजे जादूची छडी नव्हे; उलट ते दुधारी शस्त्र... समजून घ्या कसं!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 4:56 AM

डेक्झामिथॅझोन हे औषध आधीपासूनच कोरोना संसर्गावरील उपचारात वापरले जाते. जे रुग्ण गंभीर होतात, ज्यांना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज पडते अशांनाच दिले जाते.

- डॉ. अमोल अन्नदाते

डेक्झामिथॅझोन हे औषध ‘कोविड-१९’ या महामारीवर रामबाण औषध ठरते आहे, अशा मथळ्याची बातमी एका परदेशी इंग्रजी वृत्तसमूहाने प्रकाशित केली. ती सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. पण यातून असा अर्थ कोणीही काढू नये की कोरोना झाला की, लगेच डेक्झा हे औषध द्यायचे... तसेच हे औषध दिले की लगेचच आजार बरा होणार. हे औषध मग प्रतिबंधासाठीही वापरता येईल, असाही अनेकांचा गैरसमज होण्याच्ची शक्यता आहे.डेक्झामिथॅझोन हे औषध आधीपासूनच कोरोना संसर्गावरील उपचारात वापरले जाते. जे रुग्ण गंभीर होतात, ज्यांना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज पडते अशांनाच दिले जाते. काही रुग्णांमध्ये प्रतिकारशक्तीचा व कुठल्याही विषाणू संसर्ग झाल्यास शरीरात आवश्यक प्रमाणात निर्माण होणारे सायटोकाइन हा घटक जास्त प्रमाणात निर्माण होतो व या घटकाचे वादळ येते, ज्याला सायटोकाइन स्टॉर्म असे म्हणतात. यासाठी डेक्झामिथॅझोन किंवा काही वेळा मिथाइल प्रीडनीसेलोन हे स्टेरॉइड वापरले जातात. पण लक्षणविरहीत व सौम्य तसेच मध्यम स्वरूपाचे लक्षण असलेल्या रुग्णांना याची गरज नसते.फक्त डेक्झामिथॅझोनक नव्हे इतर अनेक गोष्टी या ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांसाठी वापरल्या जातात... ज्या जीव वाचवण्यास उपयोगी ठरू शकतात. म्हणून डेक्झामिथॅझोन हे उपयोगी पडत असले तरी ते रामबाण उपाय आहे, असे मानणे चुकीचे ठरेल. वैद्यकीय प्रॅक्टिसमध्ये डेक्झामिथॅझोन इतर स्टेरॉइड हे बºयाचदा स्वैरपणे व गरज नसताना वापरले जाते. पण ते एक दुधारी शस्त्र आहे. गरज असेल तेव्हा वापरले तर जीव वाचवणारे ठरू शकते व गरज नसताना वापरल्यास गुंतागुंत वाढवणारे ठरू शकते. या आजाराच्या बाबतीत हे खरे असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय व ठरलेल्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणेच वापरले गेले पाहिजे. 

(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या