एकीकडे जगभरातील देश कोरोनाला मात देण्यासाठी एकत्र येऊन काम करत आहेत. तर दुसरीकडे वैज्ञानिकांनी घातक व्हायरसबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. वैज्ञानिकांनुसार, कोरोना व्हायरसला मात देणारे रूग्ण त्यांच्यातील लक्षणे नष्ट झाल्यावरही कमीत कमी 8 दिवसांपर्यत संक्रमण पसरवू शकतात. त्यामुळे 14 दिवसांपर्यंत क्वारंटाईन ठेवण्यावरून संशय व्यक्त केला जात आहे.
express.co.uk च्या रिपोर्टनुसार, चीनमधील वैज्ञानिकांनी कोरोनाने पीडित असलेल्या 16 रूग्णांवर एक रिसर्च केला. ज्यातून समोर आले की, हे रूग्ण ठीक झाल्यावर त्यांच्यात लक्षणे दिसणे बंद झाले, पण लक्षणे त्यांच्यात कमीत कमी 8 दिवस आणखी राहिले होते.
या रिसर्चनुसार, कोरोनाची लक्षणे सरासरी 5 दिवसांपर्यंत दिसून येतात आणि कोरोना सात दिवसात खूप वाढलेला असतो. पण नुकत्याच करण्याच करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये याचा खुलासा करण्यात आला की, कोरोनाची लक्षणे रूग्णांमध्ये तो बरा झाल्यावर आणखी आठ दिवस राहतात. त्यामुळे हा व्हायरस एखाद्या व्यक्तीमध्ये राहण्याचा कालावधी हा 20 दिवस झाला आहे आणि 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी कमी पडू शकतो.
अमेरिकन जर्नल ऑफ रेस्पिरेटरी अॅन्ड क्रिटिकल केअर मेडिसिनमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, बीजिंगच्या ट्रीटमेंट सेंटर ऑफ पीएलए जनरल हॉस्पिटलच्या वैज्ञानिकांनी 35 वय असलेल्या सरासरी रूग्णांच्या डेटावरून हे विश्लेषण केलंय.
यावर याले स्कूल ऑफ मेडिसिनच्या डिपार्टमेंट ऑफ मेडिसिनच्या प्लमोनरी क्रिटिकल केअर अॅन्ड स्लीप मेडिसिन सेक्शनचे इन्स्ट्रक्चर ऑफ मेडिसिन आणि रिसर्चचे सह-लेखक डॉ. लोकेश शर्मा यांनी सांगितले की, आमच्या रिसर्चमधील महत्वपूर्ण निष्कर्ष हे त्या रूग्णांकडून काढण्यात आले आहेत ज्या रूग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नष्ट झाली होती आणि त्यांच्यातील व्हायरस नष्ट झाल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. जास्त गंभीर संक्रमण जास्त काळासाठी राहू शकतं.
बीजिंगच्या चायनीज पीएलए जनरल हॉस्पिटलच्या प्लमोनरी अॅन्ड क्रिटिकल केअर मेडिसिन कॉलेजमध्ये प्राध्यापक एमडी लिक्सिन शी म्हणाले की, जर तुम्हाला कोरोनाती हलकी लक्षणे असली तरी आणि तुम्ही घरात राहत असाल तर भलेही तुम्ही लोकांना संक्रमित करत नसाल, पण ठीक झाल्यावर तुमचा क्वारंटाईन वेळ दोन आठवड्यांसाठी वाढवा. असं करून तुम्ही दुसऱ्या लोकांना संक्रमित करणार नाही.
(Image Credit : nytimes.com)
या रिसर्चने संपूर्ण मेडिकल विश्वाला सूचना दिली आहे की, कोरोनाग्रस्त रूग्णातील लक्षणे दूर झाल्यावरही पुन्हा दिसू शकतात. त्यामुळे नुकतेच बरे झालेल्या लोकांनी अधिक सावध राहणं गरजेचं आहे. जसे की, लक्षणे असणाऱ्या रूग्ण घेतात. डॉक्टर शी म्हणाले की, सध्या यावर अधिक रिसर्च करण्याची गरज आहे. हे जाणून घेण्याची गरज आहे की, एकदा कोरोनातून बरे झालेले रूग्ण नंतर पुन्हा संक्रमण पसरवू शकतात की नाही.