शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "राणे कुटुंबीयांचा त्रास, लोकसभा, विधानसभा...";राजन तेलींनी आरोप करत घेतला मोठा निर्णय
2
एमआयएममुळे आता काँग्रेसचे वाढले टेन्शन; नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत रंगत 
3
“रवी राणा यांच्यामुळेच नवनीत राणा खासदार होऊ शकल्या नाहीत”; बच्चू कडूंचा थेट प्रहार
4
बाप-बेटी एकाचवेळी नशीब अजमावणार; निवडणूक शिवाजीनगरमधून लढणार?
5
५०० च्या नोटांवर अनुपम खेर यांचा फोटो का छापला?; आरोपीचं उत्तर ऐकून बसेल मोठा धक्का
6
३२ टक्क्यांपर्यंत घसरला TATA च्या 'या' कंपनीचा नफा; आता शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा
7
"बाबा सिद्दीकी चांगला माणूस नव्हता, त्यांच्यावर..."; लॉरेन्स बिश्नोईच्या शूटरचे धक्कादायक वक्तव्य
8
समीर वानखेडेंना शिंदेसेनेचा नकार, संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितलं 
9
Diwali 2024: कसे करावे देवाच्या जुन्या, भग्न मूर्ति आणि फोटोंचे विघटन? वाचा शास्त्रशुद्ध उपाय!
10
मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि मेळावाच रद्द झाला; ठाणे जि.प. च्या माजी उपाध्यक्षांना मुरबाड देणार?
11
Diwali 2024: दिवाळीत घरबरोबरच मनाची स्वच्छता कशी करायची ते सांगताहेत गौर गोपाल दास!
12
"बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट अवस्था करणार"; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, ५ कोटींचाही उल्लेख
13
या संघानं ४५ धावांत All Out झाल्यावर जिंकली होती टेस्ट; टीम इंडियाला ते शक्य होईल?
14
दिवाळीपूर्वी शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह उघडले; Midcap स्टॉक्स आपटले
15
राहुचे नक्षत्र गोचर: ५ राशींना लॉटरी, धनलाभाचे योग; स्वप्नपूर्ती, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
16
IPL 2025: काव्या मारनला धक्का! लिलावाआधी दिग्गज क्रिकेटपटूने सोडली SRH ची साथ
17
Success Story : एकेकाळी RBI मध्ये केलंय काम, आता अब्जाधीशांमध्ये आलंय नाव; कोण आहेत सौरभ गाडगीळ?
18
आजचे राशीभविष्य: ५ राशींना धनलाभ, प्रमोशन, पगारवाढ योग; चैतन्य, उत्साहाचा दिवस
19
आसाम नागरिकत्वाचे ‘कलम ६-अ’ वैधच; १९७१ पर्यंत आलेल्यांना नागरिकत्व - सर्वोच्च न्यायालय 
20
राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर पेच; तिकिटासाठी कोणता झेंडा हाती? आधी करतायत चाचपणी 

CoronaVirus News: कोरोना रुग्णांना पालथं का झोपवतात, माहित्येय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 4:02 AM

ज्यांना सर्दी, खोकला, ताप अशी सौम्य लक्षणे आहेत व रुग्णालयात दाखल झालेले नसून घरीच उपचार घेत आहेत अशांनी ही पालथे म्हणजेच पोटावर झोपावे.

ज्या कोरोनाबाधितांना रुग्णालयात दाखल केले जाते त्यांच्यासाठी पालथे झोपणे हा उपचाराचा एक भाग आहे. पण जे लक्षणविरहीत कोरोना संसर्गित आहेत व ज्यांना सर्दी, खोकला, ताप अशी सौम्य लक्षणे आहेत व रुग्णालयात दाखल झालेले नसून घरीच उपचार घेत आहेत अशांनी ही पालथे म्हणजेच पोटावर झोपावे. पालथे झोपल्याने कोरोना झाल्यावर शरीरात ऑक्सिजन कमी पडण्याची शक्यता कमी होते व ऑक्सिजन कमी पडत असेल तर ते भरून निघते व व्हेंटिलेटरची गरज काही प्रमाणात कमी होऊ शकते. अर्थात पालथे झोपून ही शरीरात ऑक्सिजनची पातळी मेंटेन राहत नसेल तर व्हेन्टीलेटरचा वापर करावा लागतो. लक्षणविरहीत व सौम्य लक्षणे असलेल्यांना घरी ठेवले जाते व फारसे उपचार नसतात. अशांसाठी पालथे झोपण्याचे विशेष महत्त्व आहे.पालथे झोपल्याने नेमके काय होते?पालथे झोपल्याने फुफ्फुसाचा मागच्या बाजूचा व झोपल्यावर वरच्या म्हणजे पाठच्या बाजूला येणारा भाग खुला होता व फुफ्फुसाच्या इतर भाग अधिक खुला होतो व याला ही ऑक्सिजन मिळू लागते. उभ्याने किंवा पाठीवर झोपून हा खालच्या व मागच्या बाजूला जाणारा फुप्फुसाचा भाग फारसा उपयोगात येत नाही. म्हणून पालथे झोपल्याने फुप्फुसाच्या जास्तीत जास्त भाग काम करू लागतो व ऑक्सिजनचे प्रमाण वाढते.अजून एका कारणाने पालथे झोपल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. २०% लोकांना घोरण्याचा आणि झोपेत श्वसन मार्गाच्या वरच्या भागात अडथळा निर्माण झाल्याने शरीराला ऑक्सिजनची कमतरता भासण्याचा आजार असतो. याला ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनियाचा त्रास असतो. हे लठ्ठपणा व मधुमेह असणाऱ्यांमध्ये जास्त आढळते. नेमके हेच कोरोना होण्याची जोखीम जास्त असणारे आजार आहेत. पालथे झोपल्याने पडजीभ व जीभ झोपेत मागे न पडून झोपेत ऑक्सिजन कमी पडण्याचा हा आजार ही कमी होतो आणि शरीराची ऑक्सिजनची पातळी वाढते. पालथे झोपताना एक काळजी घ्यावी. खरे आदर्श पालथे झोपणे म्हणजे कपाळ हे बिछान्याला लागलेले असे आहे ज्या साठी आपण नियमित वापरतो ते बिछाने वापरून असे झोपणे शक्य नाही. म्हणून आपल्याला मान एका बाजूला करून झोपावे लागेल. अशा वेळी सवय नसल्याने मानेला कळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक दिवस आड मान एक एका बाजूला करून झोवे. झोपण्या आधी व उठल्यावर ब्रम्ह मुद्रा म्हणजे मान दोन्ही बाजूला व वर खाली हलवण्याचा व्यायाम ५ ते १०० वेळा करावा .कोरोना नसलेल्यांनी ही सध्या साथ सुरू असल्याने पालथे झोपावे का?ज्यांना कोरोना नाही अशांनी पालथे झोपण्याची गरज नाही. कारण आपल्याला नियमित असे झोपण्याची सवय नसते.- अमोल अन्नदाते, (लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या