प्रत्येकजण कोरोना विषाणूच्या माहामारीमुळे चिंतेत आहे. मागील वर्षापासून या विषाणूने बरेच स्ट्रेन दाखवले आहेत. आजकाल कोविड -१९ च्या नवीन स्ट्रेननं जगातील देशांमध्ये खळबळ उडाली आहे. संक्रमण झालेलं असतानाही चाचणी केल्यानंतर निगेटिव्ह रिपोर्ट येण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढता धोका लक्षात घेता आता काही आरोग्य तज्ज्ञांनी डबल मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे.
त्याच वेळी काही डॉक्टर असे म्हणतात की जर आपण एन 95 किंवा थ्री-लेयरसह कोणतेही फिट मास्क घातला तर एकच मास्क पुरेसा आहे. मास्क लावल्यानंतर आपल्याला श्वास घेण्यास त्रास होत नाही ना? तसंच तोंड आणि नाक व्यवस्थित झांकल जातंय ना गोष्टी पाहायला हव्यात. आपली इच्छा असल्यास, आपण कोविडपासून आपले संरक्षण मिळवण्यासाठी द्वि-स्तरीय सर्जिकल मास्क किंवा कापड्याने बनलेला मास्क देखील वापरू शकता.
एन ९५ मास्क वापरत असलेल्यांना डबल मास्कची गरज आहे का?
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आपण एन 95 किंवा थ्री-प्लाई मास्क वापरत असल्यास डबल मास्क आवश्यक नाही. मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या इन्स्टिट्यूट ऑफ रेस्पीरी पल्मोनरी इंटेंसिव्ह केअर (साकेत कॉम्प्लेक्स) चे प्रधान संचालक आणि एचओडी डॉक्टर विवेक नांगिया यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'दोन मास्क परिधान केल्याने म्हणजेच तुम्हाला डबल मास्क लावल्यानं बरेच संरक्षण मिळू शकते.
याशिवाय एन ९५ मास्कचा वापर केल्यास इतर मास्कची आवश्यकता भासणार नाही. जेव्हा त्यांना विचारले की गर्दीच्या ठिकाणी एखादा माणूस कसा सुरक्षित असेल? त्यानंतर त्यांनी उत्तर देताना सांगितले, "लोकांनी एन 95 चा मास्क घालावा जो विमानतळ किंवा कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी जाण्यासाठी पुरेसा आहे."
समोर आली कोरोनाची ५ गंभीर लक्षणं; सामान्य समजून दुर्लक्ष करणं ठरु शकतं संसर्गाचं कारण
डॉ. विवेक नांगिया म्हणाले, ''कोरोनापासून बचाव करण्यासाठी फक्त मास्क घालणे पुरेसे नाही, तर योग्य नियमांचे पालन करणेही महत्त्वाचे आहे. मास्क घालताना नाक आणि तोंड झाकले पाहिजे याची खात्री करा. तसेच, हनुवटीच्या खालपर्यंत पाहिजे. मास्कने चेहरा व्यवस्थित झाकून घ्या आणि त्यास नाकाच्या खाली खेचू नका.
पॉझिटिव्ह आल्यापासून उपचारांपर्यंत; लवकर बरं होण्यासाठी कोरोनाबाबत या गोष्टी माहीत करून घ्या
डॉक्टरांनी स्पष्ट केले की, ''बर्याचदा लोक त्यांच्या नाकाखाली मास्क घालतात आणि बोलत असताना खाली खेचतात, जे योग्य नाही. कदाचित समोरचा व्यक्ती संक्रमित असावा, म्हणून मास्क काढून टाकण्याऐवजी आपण किंचित मोठ्या आवाजात बोलावे, कारण बोलताना मास्क काढून टाकणे आरोग्यासाठी वाईट असल्याचे सिद्ध होऊ शकते.''