कोरोना व्हायरसमुळे हैराण असलेल्या आणि जगणं मुश्किल झालेल्या लोकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. अमेरिकेतील यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामधील एका रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, कोरोना व्हायरस महामारी पृष्ठभाग जसे की, दरवाजाच्या माध्यमातून पसरत नाही. या रिसर्चमध्ये सहभागी प्राध्यापिका मोनिका गांधी यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस पसरण्याचा मुद्दा वास्तवात नष्ट झाला आहे. त्यांनी सांगितले की, पृष्ठभागावर पडलेल्या व्हायरसमध्ये अजिबात इतकी शक्ती नसते की, त्याने एखाद्या व्यक्तीला आजारी करावं.
जास्त फायदेशीर उपाय काय?
theaustralian.com.au ने दिलेल्या वृत्तानुसार, या रिसर्चमधून समोर आलं आहे की, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी हात धुणे आणि चेहऱ्याला हात न लावणे यापेक्षाही फायदेशीर उपाय आहे सोशल डिस्टंसिंग आणि मास्क घालणे. मोनिका यांनी सांगितले की, याचा अर्थ असाही आहे की, संपूर्ण जगात पृष्ठभागावर बॅक्टेरिया नष्ट करणाऱ्या स्प्रेचा वापर अनावश्यक ठरू शकतो. कोरोना महामारी दरम्यान संपूर्ण जगात या स्प्रेचा वापर पृष्ठभागावर केला जात आहे. ( सावधान! कोरोना टेस्टसाठी वापरली जाणारी स्वॅब स्टीकही घेऊ शकते जीव, थोडक्यात वाचला एका महिलेचा जीव)
कसा पसरतो कोरोना?
प्राध्यापिका गांधी यांनी यूएस सायन्स वेबसाइट नउटिलुससोबत बोलताना सांगितले की, 'कोरोना व्हायरस पृष्ठभागावरून जसे की, जमिनीवरून, एखाद्या वस्तूला हात लावल्याने पसरत नाही. या महामारीच्या सुरूवातीला संक्रमित पदार्थांवबाबत अनेक लोकांना भीती होती. आता आम्हाला समजलं की, कोरोना व्हायरसच्या प्रसाराचं मुख्य कारण पृष्ठभाग किंवा डोळ्यांना स्पर्श करणं नाही'. त्या म्हणाल्या की, 'कोरोना व्हायरस हा कोरोना व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीजवळ गेल्याने पसरतो. जर त्यांचं नाक वाहत असेल किंवा उलटी होत असेल तर त्यातून पसरतो'. (सावधान! कोरोना रुग्ण बरे झाल्यानंतरही ९० दिवसांपर्यंत संसर्ग पसरवू शकतात)
वाढतेच आहे महामारी
दुसरीकडे सायन्स मॅगझिन लांसेटच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, कोरोना व्हायरस जर पृष्ठभागावर असेल तर त्यापासून फार कमी धोका आहे. दरम्यान जगभरात अनेक उपाय-प्रयत्न करूनही कोरोना महामारी वाढतच आहे. आतापर्यंत १ लाखांपेक्षा लोकांचा या महामारीमुळे जीव गेलाय. चीनमधून पसरलेल्या या महामारीचे अमेरिका, भारत, ब्राझील आणि रशिया केंद्र बनले आहेत. (अरे व्वा! IIT तज्ज्ञांनी तयार केला अनोखा टी-शर्ट; संपर्कात येताच कोरोना व्हायरस नष्ट होणार)