नवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटनं जगातील अनेक देशांची चिंता वाढवली आहे. कोरोनावर हळूहळू नियंत्रण येत असतानाच ओमायक्रॉननं डोकं वर काढलं. दक्षिण आफ्रिकेतून पसरलेल्या या व्हेरिएंटनं बहुतांश देशात शिरकाव केला आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेने ओमायक्रॉन हा अतिशय वेगाने संक्रमित करणारा व्हेरिएंट असल्याने कोरोना रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत असल्याचं दिसून येत आहे.
मात्र कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचं संक्रमण सर्दीपेक्षा जास्त नाही. तज्ज्ञांच्या मते, ओमायक्रॉनमुळे हर्ड इम्युनिटी तयार होईल. त्यामुळे बहुतांश लोकांमध्ये सौम्य संसर्ग दिसत आहे. त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही. केवळ सतर्क राहणं गरजेचे आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटची लक्षण दिसत नसल्याने त्याने संक्रमित होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सामान्य आजाराप्रमाणे याची लक्षणं असतात. ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे न घाबरण्याची ५ कारणं आहेत.
- ओमायक्रॉन केवळ सौम्य संसर्ग आहे.
- आतापर्यंत ओमायक्रॉनचे जितके रुग्ण समोर आलेत त्यांची लक्षण सामान्य तापासारखी आहेत.
- ओमायक्रॉनने संक्रमित होणाऱ्या रुग्णांच्या ऑक्सिजन पातळीवर काही परिणाम होत नाही.
- ओमायक्रॉन संक्रमित रुग्णांमध्ये काही दिवसांसाठीच लक्षणं दिसून येतात.
- ओमायक्रॉन संक्रमित झाल्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे.
ओमायक्रॉन व्हेरिएंटचा फुफ्फुसांवर डेल्टाच्या तुलनेत १० पट कमी प्रभाव पडतो. तर डेल्टाचा फुफ्फुसावर खूप वाईट परिणाम होत असे. डेल्टाची लागण झाल्याने ब्लॅक फंगस होऊ शकतो. विशेष म्हणजे ओमायक्रॉन स्वत:ला श्वसन नलिकेमध्ये विकसित करतो. तर डेल्टा व्हेरिएंट श्वसन नलिकेमध्ये थांबण्याऐवजी थेट फुफ्फुसावर हल्ला करतो. श्वसन नलिकेतील अँन्टिबॉडी Omicron व्हेरिएंटला कमकुवत करते.
डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉन व्हेरिएंट रुग्णांचे मृत्यू दर खूपच कमी आहे. त्यामुळे ओमायक्रॉन व्हेरिएंट कमी धोकादायक मानला जातो. परंतु डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेने ओमायक्रॉन व्हेरिएंट अधिक वेगाने संक्रमित करतो. त्यामुळे लोकं मोठ्या संख्येने संक्रमित होत आहेत. बर्लिनच्या स्टडीनुसार, ओमायक्रॉन हा सामान्य आजारासारखा आहे. ओमायक्रॉनमुळे गंभीर होण्याचे प्रमाणही कमी आहे. ओमायक्रॉनने संक्रमित होणाऱ्यांमध्ये जास्त अँन्टिबॉडी तयार होते जी व्हॅक्सिनच्या तुलनेने १४ पट शरीरात बनते.