नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव हवेच्या माध्यमातून होऊ शकतो, अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु होती. मात्र, सध्या एका स्टडीवरुन याबाबत पुरावे मिळाले आहेत.
स्टडीमध्ये रुग्णालयांमध्ये तयार करण्यात आलेल्या कोविड-१९ वॉर्ड्समध्ये असलेल्या हवेत कोरोना व्हायरसचे सॅम्पल मिळाले आहेत. असा दावा केला जात आहे की, मोकळ्या जागेत पसरणारे हे कण दोन तासांहून अधिक वेळ हवेत राहू शकतात. मात्र, असिम्टोमॅटीक म्हणजेच कोणतीही लक्षणे असलेल्या रुग्णांच्या प्रकरणात धोका काही कमी आहे.
सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलेक्युलर बायोलॉजी (Centre for Cellular and Molecular Biology) आणि सीएसआयआर इंस्टिट्यूट ऑफ मायक्रोबायल टेक्नॉलॉजीच्या (CSIR-Institute of Microbial Technology) स्टडीमध्ये समजले आहे की सामान्य वार्डांच्या तुलनेत कोविड वॉर्डमधील हवेत कोरोना व्हायरसचे कण आढळले आहेत.
दुसरीकडे, 'द प्रिंट'च्या रिपोर्टनुसार, कोरोना व्हायरसचे कण हवेत दोन तासांहून अधिक वेळापर्यंत राहू शकतात. स्टडीनुसार, हे कण हवेतून संसर्ग पसरवू शकतात. सीसीएमबीकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, हवेत SARS-CoV-2 चे संक्रमण थेट खोलीतील रूग्ण, त्यांची तब्येत आणि त्यांच्या संपर्काशी संबंधित आहे.
स्टडीनुसार, जेव्हा कोविड-१९ चे रुग्ण खोलीत जास्त वेळ घालवतात. तेव्हा हवेतील व्हायरस दोन तासांहून अधिक वेळ राहू शकतात. या कणांचे अंतर रुग्णांपासून दोन मीटरहून जास्त असू शकते. मात्र, स्टडीचा अद्याप आढावा घेतला नाही.
लक्षणे नसलेल्या रुग्णांचे काय?लक्षणे नसलेल्या रुग्णांच्याबाबतील स्टडीमधून मिळालेली माहिती दिलासा देणारी आहे. लक्षणे असलेले रुग्ण असिम्प्टोमॅटिक रुग्णांच्या तुलनेत जास्त धोकादायक आहेत.