कोरोना व्हायरसने (Coronavirus) जगभरात थैमान घातलं आहे आणि याचा नवा स्ट्रेन लोकांना वेगाने संक्रमित करत आहे. या महामारीत केवळ मनुष्यांचाच नाही तर प्राण्यांचाही जीव जातो आहे. ताजी घटना आहे ब्रिटनची. इथे कोरोना व्हायरसने संक्रमित झाल्यामुळे एका पाळीव मांजरीचा (Cat Died from Corona) मृत्यू झालाय. मीडिया रिपोर्टनुसार, मालक कोरोना संक्रमित झाल्यावर मांजरही संक्रमित झाली होती. रिसर्चमधून मनुष्यापासून मांजरीला कोरोना व्हायरस संक्रमण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
वैज्ञानिकांनी ब्रिटन आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेत एक व्यक्ती कोरोना संक्रमित झाल्यानंतर त्याच्या मांजरीलाही संक्रमण झाल्याचा खुलासा झाला आहे. चार महिन्याच्या मांजरीला एप्रिल २०२० मध्ये पशु चिकित्सकाकडे उपचारासाठी नेण्यात आलं होतं. कारण तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. (हे पण वाचा : CoronaVirus News: ...तर तुम्हाला कोरोना होण्याचा धोका होईल कमी; फक्त स्वत:ला 'ही' एक सवय लावा)
नंतर मांजरीची तब्येत आणखी बिघडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आले की, मांजरीला व्हायरल निमोनिया झाला होता. ज्यामुळे तिच्या फुप्फुसाला नुकसान झालं होतं. तिच्या शरीरात कोरोना व्हायरसचे आढळून आले होते.
दरम्यान ज्या मांजरीचा कोरोना व्हायरसमुळे जीव गेला तिच्या मालकालाही आधी कोरोनाची लागण झाली होती. पण त्याने मांजरीचा कोरोना टेस्ट केली नव्हती. वैज्ञानिकांना मोठ्या प्रयत्नांनंतर हे समजू शकलं की, मालकाच्या माध्यमातूनच मांजरीला कोरोनाची लागण झाली होती.
वैज्ञानिक म्हणाले की, याचे काही पुरावे नाहीत की, पाळीव प्राण्यातून व्हायरस मनुष्यात पसरतो. पण हे तपासण्याची आणि त्यावर शोधाची गरज आहे. जेणेकरून भविष्यात महामारीचा प्रकोप होऊ नये.