कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. आरोग्यतज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसचा प्रसार सध्या अधिक वेगाने होऊ शकतो. कारण पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. कोरोनाच्या माहामारीमुळे लाखो लोकांनाचा जीव गेला असला तरी तज्ज्ञांच्यामते या माहामारीचे रौद्र रुप अजूनही पाहायला मिळालेलं नाही. त्यामुळे विषाणूंची संख्या वाढू शकते का असं सगळ्यांनाच वाटत आहे.
जगभरातील तज्ज्ञ लोकांना पावसाळ्यात कोरोनाबाबत आणखी खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहेत. कारण आर्द्रतेमुळे कोरोना व्हायरस बरेच दिवस हवेत तरंगू शकतो. यामुळे वेगाने संक्रमणाचा धोका वाढू शकतो. त्यासाठी संतुलित आहार आणि ताज्या फळांचा जास्त समावेश करा. जेणेकरून शरीरातून बाहेर पडत असलेल्या सोडियम आणि ग्लुकोजचा स्तर शरीरात टिकून राहतो. त्यामुळे फ्लू किंवा कोरोना व्हायरसचं संक्रमण होऊ शकत नाही.
पावसाळ्यात कोरोनाला दूर ठेवण्याासाठी असे करा उपाय
कोरोनाच्या माहामारीचा हा पहिला पावसाळा आहे. दमट हवामानामुळे जंतू वाढतात. परिणामी सर्दी, ताप, खोकला अशी समस्या उद्भवतात. तसंच कोरोनाची लक्षणं सुद्धा अशीच असल्याने काळजी घ्यायला हवी.
लहान मुलांचे लसीकरण करा. कारण गोवर, डेंग्यू, मलेरिया अशा आजारांची लागण होऊ शकते.
घरातील कुड्या किंवा भांड्यामध्ये पाणी साचू देऊ नका.
ओल्या कपड्यात राहिल्यामुळे इन्फेक्शन वाढू शकतं. शक्यतो ओले कपडे जास्तवेळ अंगावर ठेवू नका.
घरात धूळीचे कण नसतील याची काळजी घ्या. साफसफाई करा आणि स्वच्छता ठेवा.
पावसाळ्यात आयुर्वेदीक चाहाचे सेवन करा. चहाचा मसाला तयार करण्यासाठी आधी लवंग, वेलची, काळी मिरी आणि बडीशेप वापरा, तसंच चहात तुळशीच्या पानांचा समावेश करा
सकाळी आणि संध्याकाळी हळदीच्या दुधाचे सेवन करा. संतुलित आहार घ्या.
पुरेशी झोप घ्या, जास्तीत जास्त गरम पाणी पिण्याचा प्रयत्न करा.
आता कोरोना विषाणूला ९९ टक्के नष्ट करणारी लस येणार; क्लिनिकल ट्रायलचे 2 टप्पे यशस्वी
घरात राहूनही 'असा' होऊ शकतो कोरोनाचा संसर्ग; हे उपाय वापरा आणि संसर्गापासून लांब राहा