जगभरात कोरोना व्हायरसचे संक्रमण होत असलेल्या आणि त्यामुळे मृत्यू होत असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना व्हायसरमुळे इन्फेक्टेड झालेल्यांची संख्या ५ लाखापेक्षा जास्त आहे. अशात शासनाकडून वेगवेगळ्या गोष्टींसाठी आवाहन केलं जात आहे. स्वच्छता बाळगण्यापासून सोशल डिस्टंसिंगपर्यंत कोरोनाला रोखण्यासाठी काय महत्वाचं आहे. याबाबत माहिती दिली जात आहे.
खोकण्यातून, शिंकण्यातून, हवेमार्फत हा आजार पसरतो याबाबत तुम्हाला माहित असेल. पण कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन डोळ्यातून सुद्धा पसरत असतं. एका रिपोर्टनुसार शरीरातील तरल पदार्थ डोळ्यातून बाहेर पडत असतो. तेव्हा शरीरात इन्फेक्शन पसरू शकतं. त्यामुळे फक्त मास्क घालणं पुरेसं नाही.
डोळ्यातून निघत असलेले अश्रूंमुळेही कोरोनाचं इन्फेक्शन होऊ शकतं. जेव्हा इनफेक्टेड व्यक्ती, शिंकत किंवा खोकताना त्याच्या शरीरातून निघत असलेल्या लिक्विडमुळे व्हायरस शरीरातून डोळ्यांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे संक्रमणाचा धोका असतो. ज्या लोकांना कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन झालं आहे. ते अश्रूंमार्फत सुद्धा पसरू शकतं. त्यामुळे डोळ्यांना हात लावणं, इन्फेक्शनचं कारणं ठरू शकतं. त्यामुळे डोळे चोळल्यानंतर इतर ठिकाणांना हात लावणं घातक ठरू शकतं. ( हे पण वाचा- CoronaVirus : स्वाईन फ्लू आणि कोरोना व्हायरस कसे आहेत वेगळे? फरक जाणून घ्या)
डोळ्यांद्वारे होणारं इन्फेक्शन रोखण्यासाठी हे करा उपाय
कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सतत हात धुवा. आपल्या डोळ्यांना हात लावल्यानंतर इतर ठिकाणी स्पर्श करू नका. डोळे जास्त चोळू नका. जर तुम्हाला इन्फेक्शनपासून वाचायचं असेल तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. गरजेच्या कारणासाठी दवाखान्यात जाताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. जर तुमचे कोरडे पडले असतील तर सतत चोळू नका. त्याासाठी आयड्रॉप घाला. नंतर आपले हात साबणाने धुवा. सोशल डिस्टेंसिंग पाळणं गरजेचं आहे. त्यामुळे पसरत असलेल्या इन्फेक्शनला रोखलं जाऊ शकतं. ( हे पण वाचा-CoronaVirus : सावधान! किराणासामान, दुधासह व्हायरसपण आणताय का घरी? अशी घ्या काळजी)