नवी दिल्ली - सर्वांत भयावह वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढवण्याची क्षमता असलेल्या ओमायक्रॉनचा शिरकाव भारतात झाला आहे. दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेल्यांपैकी काही जणांना कोरोनाची लागण झाला आहे. काही जणांचा शोध सुरू आहे. मात्र, त्यांना ओमायक्रॉन या विषाणूची बाधा झाली की नाही, हे जिनोम सिक्वेन्सिंगद्वारे केले जाते.
मात्र, हे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. जाणून घेऊया... काय असते ही यंत्रणा, कशी काम करते आणि धीम्या गतीने चाचण्या होणे हे चिंताजनक कशामुळे? काय असते जिनोम सिक्वेन्सिंग? जाणून घेऊया... भारतात कमी होणाऱ्या चाचण्यामुळे चिंता वाढली
जिनोम सिक्वेन्सिंगमधून नवा विषाणू प्रकार कसा कळतो?जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये जिनोमच्या जीनमध्ये झालेले बदल दिसून येतात. जीन हे डीएनएपासून तयार झालेले असतात. जे शरीरात प्रोटीन तयार होण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडतात. या जीनमध्ये म्युटेशन झाले तर त्यातून नवा आजार किंवा नवा व्हेरिएंट याची माहिती मिळते. कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनची माहितीही जिनोम सिक्वेन्सिंगद्वारे मिळाली. विषाणूमध्ये स्पाइक प्रोटीन न मिळाल्याने हा नवा विषाणू असल्याचे समजले होते.
जिनोम सिक्वेन्सिंगचा फायदा काय?
याद्वारे कोणत्याही विषाणूचा संपूर्ण बायोडाटाच काढता येतो. जिनोममध्ये झालेल्या बदलाची माहिती यातून मिळते.याच बदलामधून शास्त्रज्ञ एखाद्या विषाणूचा नवा प्रकार शोधून काढतात. जिनोम सिक्वेन्सिंगमुळे विषाणू तर कळतोच, शिवाय याचा फायदा उपचारासाठीही होतो. एचआयव्ही, सार्स विषाणू यांचीही जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात येते.
किती वेळ, किती खर्च?४ हजार ते ८ हजार रुपये खर्च जिनोम सिक्वेन्सिंगसाठी येतो. या प्रक्रियेसाठी २४ ते ९६ तासांचा कालावधी लागतो. भारतात त्याहूनही अधिक काळ लागतो आहे.
एकूण कोरोना रुग्णांच्या तुलनेत किती केले जाते जिनोम सिक्वेन्सिंग?भारत ०.२ टक्केअमेरिका ३.६२ टक्केकॅनडा ९.०९ टक्केस्वीत्झर्लंड ९.०८ टक्केब्रिटन १२.८ टक्केनॉर्वे १३.०१ टक्केडेन्मार्क ४६.८ टक्केआयलँड ५६.२ टक्के
जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये कोणते राज्य आहे पुढे?केरळ महाराष्ट्र दिल्ली पश्चिम बंगाल तेलंगणा