कोरोना व्हायरसच्या भीतीने सध्या अर्ध अधिक जग जागीत थांबलेलं आहे आणि कित्येक लोक आपल्या घरात कैद आहेत. रोज कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढत आहे आणि मृतांचा आकडाही वाढत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सोबतच जगभरातील आरोग्य तज्ज्ञ या व्हायरसपासून बचावासाठी सोशल डिस्टंसिंगचं महत्व सांगत आहेत. हा कोरोना व्हायरस नाक आणि तोंडातून थेंबाच्या माध्यमातून पसरत आहे. त्यामुळे लोकांना व्हायरस पसरू नये म्हणून शिंकताना किंवा खोकतांना रूमाल किंवा हाताच्या कोपराचा वापर करण्यास सांगितलं जात आहे.
पण रूमाल किंवा शर्ट-टीशर्ट ज्यावर तुम्ही खोकता त्याद्वारे व्हायरस पसरत नाही का? किंवा शिंकल्यावर आणि खोकल्यावर व्हायरस पसरणं रोखण्यासाठी खास काळजी घेण्याची गरज आहे का? चला जाणून घेऊ या प्रश्नांची उत्तरे...
कपड्यांवर किती वेळ अॅक्टिव राहतात व्हायरस?
एक्सपर्ट्सनुसार नोवल कोरोना व्हायरस सामान्यपणे Hard Surfaces वर जास्तवेळ अॅक्टिव राहू शकतो. अनेक रिसर्चमधूनही हे समोर आलं आहे की, वेगवेगळ्या Surfaces वर 2 तास ते 9 दिवसांपर्यंत हा व्हायरस अॅक्टिव राहतो. पण मुलायम Surfaces हा व्हायरस जास्त टिकत नाहीत. वैज्ञानिकांनुसार, याचं कारण कठोर Surfaces वर हा व्हायरस चिकटून राहतो आणि जास्तवेळ अॅक्टिव राहतो.
कपड्यांवर हा व्हायरस अपेक्षेपेक्षा कमी वेळ अॅक्टिव राहतो. पण याबाबत आणखी रिसर्च करण्याची गरज आहे. पण एक्सपर्ट सांगतात की, त्यांना कपड्यांवर हा व्हायरस जास्त वेळ अॅक्टिव राहत असल्याच्याही केसेस बघायला मिळाल्या.
कपड्यांमुळे कोरोना व्हायरस पसरतो?
हा व्हायरस असा आहे जो संक्रमित व्यक्तीच्या थेट संपर्कात येणाऱ्या प्रत्येक वस्तुतून पसरू शकतो आणि यात कपड्यांचाही समावेश आहे. हेच कारण आहे की, सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅन्ड प्रिव्हेंशन(CDC) आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन दोघेही यावर जोर देतात की, कपडे जर्म फ्री ठेवण्यासाठी तुम्ही काही गोष्टींची खास काळजी घ्यावी.
काय घ्याल काळजी?
- जर काही कामासाठी बाहेर निघत असाल तर घरी आल्यावर चप्पल-शूज बाहेरच काढा. लगेच चप्पल आणि शूज धुवावे.
- जर तुमच्या जवळ कुणी शिंकत असेल किंवा खोकत असेल तर घरी आल्यावर सर्वातआधी कपडे बदलावे आणि हे कपडे वेगळे ठेवावे.
- जर शक्य असेल तर कपडे कोमट पाण्यात भिजवून धुवावे.
- जर घरात कुणी संक्रमित व्यक्ती असेल किंवा कुणाला सर्दी-खोकला झाला असेल तर त्यांचे कपडे इतरांच्या कपड्यांपासून वेगळे ठेवावे.
- आजारी व्यक्तीचे कपडे धुताना हातात ग्लव्स असावेत. जेणेकरून व्हायरसची लागण होऊ नये.
- कुठेही स्पर्श केला तर 20 ते 30 सेकंद चांगले हात धुवावे.