कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागला असला तरी कोरोनानियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन सातत्याने केले जात आहे. त्यातही मास्क वापराबाबत विविध स्तरावरून सूचना केल्या जातात. कोरोनापासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर मास्क वापरणे गरजेचे आहे. त्यातही सुरक्षित मास्कला प्राधान्य आहे.
सध्या वापरात असलेले मास्क- एन-९५- डबल लेअर- सर्जिकल- कापडी
कोणता मास्क कितीदा वापरावा?- मास्क दिवसभर लावून फिरलात तर तो मास्क दुसऱ्या दिवशी वापरू नये, असा नियम आहे.- त्यातही मास्क कापडाचा असेल तर तो वापरून झाल्यावर धुण्यास टाकावा.- सर्जिकल मास्क एकदाच वापरावा. त्यानंतर तो फेकून द्यावा.
एन-९५ मास्कबाबत...- एन-९५ किंवा केएन-९५ मास्क थोडे दिवस वापरता येऊ शकतात.-अमेरिकेच्या सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) यांच्या मते एन-९५ मास्क किमान पाच वेळा वापरता येऊ शकतो.-कार्यालयीन कामकाजाच्या पूर्ण वेळेत एन-९५ मास्क वापरणे शक्य नाही, असेही सीडीसीचे म्हणणे आहे.- मास्क किती वेळा वापरावा यापेक्षा तो कितीदा वापरला गेला, हे महत्त्वाचे आहे.-कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील तज्ज्ञांच्या मते एन-९५ मास्क दोन किंवा तीन दिवस वापरणे योग्य ठरते.
धोका काय?- एन-९५ मास्क लावल्यानंतर श्वास घेतेवेळी काही धुलिकण मास्कवर अडकतात.- मास्कवर मोठ्या प्रमाणात धुलिकण जमल्यास श्वासोच्छवास घेण्यास त्रास होतो.- सतत हाच मास्क लावल्याने तो अधिकाधिक खराब होत जातो.- या सगळ्यांमुळे एन-९५ मास्कची परिणामकारकता घटण्याचा धोका असतो.- त्यामुळे शक्यतो हा मास्क दोन ते तीन दिवसच वापरावा असे तज्ज्ञांचे मत आहे.