शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

Coronavirus: कोरोनाकाळात वाढला विसरभोळेपणा, दिसताहेत अशी लक्षणे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2022 7:26 AM

Coronavirus: फोनचा क्रमांक, तारीख, कोणती संख्या किंवा नाव तुमच्या लक्षात राहत नसेल तर ही तक्रार तुमच्या एकट्याची नाही. कोरोना महामारी आल्यापासून गेल्या २ वर्षांत सगळ्यांची स्मरणशक्ती कमकुवत झाली आहे.

 नवी दिल्ली : फोनचा क्रमांक, तारीख, कोणती संख्या किंवा नाव तुमच्या लक्षात राहत नसेल तर ही तक्रार तुमच्या एकट्याची नाही. कोरोना महामारी आल्यापासून गेल्या २ वर्षांत सगळ्यांची स्मरणशक्ती कमकुवत झाली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे असे की, यामुळे लोकांत लक्ष केंद्रित न करता येणे आणि माहितीचा विसर पडण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ केंटमधील सायकोलॉजीचे वरिष्ठ लेक्चरर आमिर हुमायू जवादी म्हटले की, “मानवात परिस्थितीशी जुळवून घेण्याची सवय असते. दोन वर्षांपासून लोकांनी जीवनात जास्त काही योजना केल्या नाहीत. त्यांना त्या गोष्टी न करण्याची सवय झाली आहे. यामुळे स्मरणशक्ती व लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे.” युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियातील न्यूरो बायोलॉजीचे प्रोफेसर माइकल यास्सा म्हणतात की, महामारीच्या काळात आयुष्यात लक्षात ठेवावे, असे काही विशेष घडत नसल्याने काही लक्षात न ठेवण्याची सवय झाली आहे.”

ज्या लोकांना कोरोनाची बाधा झाली नाही, त्यांना प्रत्येक दिवस एकसारखा असणे, लोकांशी न भेटणे आणि व्यायामाच्या अभावामुळे ब्रेन फॉग होणे सुरू झाले आहे”. ब्रेन फॉग म्हणजे अशी अवस्था की, ज्यामुळे व्यक्तीच्या व्यवहारात वेगाने बदल होणे. अशा लोकांमध्ये नेहमी थकवा, चिडचिड, नैराश्य, डोकेदुखी, कोणत्याही कामात लक्ष वा मन न लागणे, झोप न येणे आणि छोट्या-छोट्या गोष्टींचा विसर पडणे, अशा तक्रारी बघायला मिळतात.     - आमिर हुमायू जवादी, वरिष्ठ लेक्चरर, युनिव्हर्सिटी ऑफ केंट, इंग्लंड

मेंदूला कोणत्या ना कोणत्या कामात व्यग्र ठेवणे गरजेचे आहे. तुम्ही मेंदूला जेवढा व्यायाम द्याल तेवढी तुमची स्मरणशक्ती बळकट होईल. 

स्मरणशक्तीसाठी हे करा n वेळेवर झोप पूर्ण करा n रोज कमीत कमी २० मिनिटे व्यायाम करा n पौष्टिक आहार घ्या n लोकांशी बोलत राहा n रोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा n तणावाला ध्यानाद्वारे कमी करा

 

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या