कोरोना व्हायरसने जगभरात कित्येक देशांमध्ये थैमान घातलं आहे. चीनमधून पसरलेल्या या व्हायरसमुळे हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातही हळूहळू हा व्हायरस पसरत आहे. दरम्यान या व्हायरसला रोखण्यासाठी सरकारने देशात लॉकडाउन केलं आहे.
अशात लोकांपासून अंतर ठेवून राहणे हाच यावरील सर्वात चांगला उपाय आहे. कारण या व्हायरसचं संक्रमण झालेला व्यक्ती कित्येक लोकांना संक्रमित करू शकतो. तज्ज्ञांचं मत आहे की, कोरोना व्हायरसने पीडित व्यक्ती 50 हजार पेक्षा जास्त लोकांना संक्रमित करू शकतो.
independent.co.uk ने दिलेल्या वृत्तानुसार, लंडनच्या इंटेन्सिव केअर मेडिसिनचे प्राध्यापक डॉ. ह्यू मॉन्टगोमरी यांच्यानुसार, कोरोना व्हायरस हा सर्वाधिक संक्रमित होणरा व्हायरस आहे. या व्हायरसने संक्रमित व्यक्ती हजारो लोकांना या व्हायरसचा शिकार करू शकतो. यापासून बचावासाठी सोशल डिस्टंसिंग हा एकमेव उपाय आहे.
डॉ. ह्यू यांच्यनुसार, सामान्य फ्लू असेल तर सरासरी 1.3 ते 1.4 लोक संक्रमित होतात. हा संक्रमित व्यक्ती पुढे अनेक लोकांना संक्रमित करतो आणि हे चक्र पुढे 10 वेळा सुरू राहतं. याप्रकारे संक्रमित व्यक्ती 14 लोकांना जाळ्यात घेतो. कोरोना व्हायरस यापेक्षा जास्त घातक आहे. ज्याची कल्पनाही आपण करू शकत नाही.
डॉ. ह्यू यांनी सांगितले की, कोरोनाचं संक्रमण एकाने तिघांना होऊ शकतं आणि ते पुढे 10 च्या लेअरमध्ये पुढे वाढतात. त्यानुसार 59,000 लोक संक्रमित होऊ शकतात. उदाहरण म्हणून खालीलप्रमाणे समजून घेता येईल....
1 पासून 3
3 पासून 9
9 पासून 27
27 पासून 81
81 पासून 243
243 पासून 729
729 पासून 2187
2187 पासून 6561
6561 पासून 19683
19683 पासून 59,049 लोकांना हा व्हायरस संक्रमित करू शकतो.
असं असलं तरी संक्रमित होणाऱ्या लोकांपैकी काही लोकच आजारी पडतील आणि फार कमी लोकांना आयसीयूमध्ये ठेवण्याची गरज पडेल. त्यामुळे घरातच रहा.