कोरोना व्हायरसच्या माहामारीनं संपूर्ण जगभरात हाहाकार पसरवला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेचे नुकसानं झालं असून कोरोनाचं संक्रमण झाल्याने लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगभरातील अनेक देशातील लोक कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी लस आणि औषध शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. अशा स्थितीत इस्त्राईलने गुरुवारी दावा केला आहे की, त्यांनी कोरोना व्हायरसशी लढण्याासाठी प्रभावी ठरत असणारी एक चमत्कारीक लस तयार केली आहे. तसंच या लसीच्या मानवी परिक्षणासाठी आता सरकारकडून परवागनी घेतली जाणार आहे.
शरदाच्या सुट्ट्या संपल्यानंतर या औषधाचे परिक्षण करण्यात येणार आहे. इस्त्राईलचे सुरक्षामंत्री बेनी गांट्ज यांनी इस्त्राईल इंस्टिट्यूट ऑफ बॉयोलॉजिकल रिसर्चचा दौराकरून याबाबत माहिती मिळवली आहे. इंस्टिट्यूटचे प्रमुख प्राध्यापक शॅमुअल शपिरा यांनी इस्त्रायली लसीबाबत माहिती दिलीआहे. इज्राईलचे सुरक्षामंत्री तसंच प्रधानमंत्री कार्यालयानं या लसीबाबत एक प्रभावी आणि परिणामकारक लस तयार केल्याचे सांगितले आहे. माणसांवर या लसीचे परिक्षण लवकरच सुरू होणार आहे. शापीरा यांनी सांगितले की आम्हाला या लसीवर खूप अभिमान आहे. या लसीचा वापर कधीपर्यंत सुरू होणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
याआधीही इस्त्राईलचे मंत्री नफताली बेन्नेट यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात के डिफेंस बायोलॉजिकल इंस्टिट्यूटनं कोरोना विषाणूंची लस तयार केली आहे. या संस्थेने कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी एँटीबॉडी तयार करण्यात यश मिळवलं आहे.
पुढे नफताली बेन्नेट यांनी सांगितले की कोरोना व्हायरसच्या लसीचे परीक्षण आता पूर्ण होत आहे. संशोधकांनी पेटंट आणि उत्पादनासाठी तयारीला सुरूवात केली आहे. ही लस एंटीबॉडी मोनोक्लोनल प्रकारे कोरोना व्हायरसवर आक्रमण करते. आजारी व्यक्तीच्या शरीरातील व्हायरला नष्ट करण्याची क्षमता या लसीत आहे.
दरम्यान कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत असला तरीही त्यात दिलासा देणारी बाब म्हणजे आतापर्यंत १३ लाख ७८ हजार १०५ लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. देशातला रिकव्हरी रेट ६७.६२% वर पोहोचला आहे. देशात ६ ऑगस्टपर्यत २,२७,२४,१३४ नमुन्यांची चाचणी झाली आहे. यांपैकी गुरुवारी ५,७४,७८३ चाचण्या करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी ग्लेनमार्क लॉन्च करणार 'फेबिफ्लू'; पहिले ९ दिवस घ्यावी लागणार औषधं
कोरोनावर मात करण्यासाठी ग्लेनमार्क लॉन्च करणार 'फेबिफ्लू'; पहिले ९ दिवस घ्यावी लागणार औषधं