मुंबई - देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग सातत्याने वाढत आहे. दरम्यान, कोरोनाला रोखायचं असेल तर आता स्वच्छताच गरजेची आहे, याची जाणीव आता सर्वांना झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वारंवार हात स्वच्छ धुण्याचे आवाहनही केले जात आहे. दरम्यान, देशात कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू झाल्यापासून हात स्वच्छ ठेवण्यासाठी सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र सॅनिटायझर योग्य प्रकारचे कसा वापर करायचा याबाबत अजूनही अनेकांना योग्य ती माहिती नाही आहे. त्यामुळे आज आपण सॅनिटायझरच्या योग्य वापराबाबत माहिती घेऊया.
कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून सॅनिटायझर हा परवलीचा शब्द बनला आहे. त्यातून गेल्या काही काळात सॅनिटायझरच्या उत्पादनाचा उद्योगही वेगाने वाढला आहे. मात्र बाजारात उपलब्ध असलेल्या सॅनिटायझरपैकी सगळेच सॅनिटायझर हे काही तितकेसे प्रभावी नसतात. त्यामुळे सॅनिटायझरची खरेदी करताना त्यामध्ये ६० ते ७० टक्के अल्कोहोल आहे का याची पडताळणी करून घ्या. तसेच हे अल्कोहोल ईथाइल किंवा आइसप्रोपाइल असले पाहिजे, हे लक्षात ठेवा.
तसेच सॅनिटायझर लावलेल्या हातांनी लगेच खाणे हे आपल्या प्रकृतीसाठी धोकादायक ठरू शकते. त्याचं कारण म्हणजे सॅनिटायझरमध्ये मोठ्या प्रमाणात अल्कोहोल असते, ते तुमचे मुत्रपिंड, यकृत आणि हृदयाला हानी पोहोचवू शकते. त्यामुळे सॅनिटायझर लावल्यानंतर किमान २० सेकंटांनंतर खाण्यास सुरुवात करा. कारण एवढा वेळ तुमच्या हातावर लावलेल्या सॅनिटायझरमधील अल्कोहोल उडून जाण्यास पुरेसा आहे.
सॅनिटायझर लावल्यानंतर कितीवेळ आपला हात सुरक्षित राहू शकतो, असा प्रश्न अनेकांना पडतो. या प्रश्नाचे उत्तर देताना डॉक्टर सांगतात की, जेव्हा तुम्ही सॅनिटायझर लावता तेव्हा तोपर्यंत तुमच्या हातावर असलेले सर्व जीवाणू आणि विषाणू नष्ट होतात. मात्र सॅनिटायझरचा वापर केल्यानंतर २० सेकंदांनी तुम्ही पुन्हा कुठल्या वस्तूला स्पर्श केला तर तुम्हाला पुन्हा हात स्वच्छ करून घ्यावे लागतील. तसेस वारंवार सॅनिटायझरचा वापर करणे योग्य नाही. तामुळे वारंवार सॅनिटायझर लावण्यापेक्षा हात धुण्याची सवय लावून घेतली पाहिजे. तसेच सॅनिटायझर लावल्यानंतर किमान १० ते १२ सेकंद आपले हात चोळले पाहिजेत.
सॅनिटायझरचा वापर करताना या दहा गोष्टींवर द्या विशेष लक्ष
- सॅनिटायझरचा नेहमी स्वच्छ दिसणाऱ्या हातांवरच वापर करा
- सॅनिटायझरमध्ये ६० ते ७० टक्के इथाइल किंवा आइसोप्रोपाइल अल्कोहोत असल्याची खातरजमा करून घ्या
- हात स्वच्छ करताना डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शक सूचनांकडे लक्ष द्या
- किमान १५ ते २० सेकंद हात धुवा, तसेच हाताच्या सर्व भागांपर्यंत सॅनिटायझर पोहोचेल याकडे लक्ष द्या
- मात्र हातांच्या स्वच्छतेसाठी ह्ँड सॅनिटाझरला प्राधान्य देऊ नका
- स्वच्छ पाण्याने हात धुतल्यानंतर पुन्हा सॅनिटायझरचा वापर करू नका
- सॅनिटायझरच्या प्रमाणाकडे लक्ष द्या
- चेहऱ्यावर सॅनिटायझरचा वापर करू नका
- जिथे हात धुण्याची व्यवस्था नसेल अशाच ठिकाणी सॅनिटायझरचा वापर करा
- सॅनिटायझरपेक्षा साबण आणि पाण्याने हात धुणे हे अधिक प्रभावी ठरू शकते. त्यामुळे गरजेच्या प्रमाणातच सॅनिटाझरचा वापर करा
इतर महत्त्वाच्या बातम्या
टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल