कोरोना व्हायरसवर लस किंवा औषध विकसीत करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती चांगली आहे. असे लोक आपल्या रोगप्रतिकारकशक्तीच्या जोरावर व्हायरसशी सामना करू शकतात. परंतू दीर्घकाळ लस किंवा औषध उपलब्ध झाले नाही. तर लोकांचा संक्रमणापासून बचाव करणं कठीण होण्याची शक्यता आहे.
हर्ड इम्युनिटीबाबत माहिती मिळवण्यासाठी तज्ज्ञांनी कोरोना व्हायरसवर अभ्यास सुरू केला आहे. या अभ्यासातून आश्चर्यकारक परिणाम दिसून आले आहेत. हर्ड इम्युनिटी अशा स्थितीला म्हणतात ज्या स्थितीत एखाद्या समुदायातील लोकांची रोगप्रतिकारकशक्ती( immune) चांगली विकसीत झालेली असते. त्यामुळे व्हायरसची चेन तुटल्याने लोकांना संक्रमणाचा सामना करावा लागत नाही.
स्पेनमध्ये फक्त ४.६ कोटी लोकसंख्या असलेला देश आहे. याठिकाणच्या २.९८ लोकांना कोरोनाचं संक्रमण झालं आहे. तर २८ हजार लोकांचा मृत्यू सुद्धा झाला आहे. या कारणांमुळे स्पेनच्या लोकांमध्ये इम्यून तयार झाल्याचे समजले जात आहे. पण संशोधनातून दिसून आले की फक्त ५ टक्के लोकांमध्ये इम्युनिटी तयार झाली आहे.
सीएनएनच्या रिपोर्टनुसार स्पेनमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासात हर्ड इम्युनिटीवर सवाल उपस्थित करण्यात आला होता. लसीशिवाय हर्ड इम्युनिटी विकसित होऊ शकणार नाही असे सांगण्यात आले होते. या अभ्यासासाठी जवळपास ६१ हजार लोकांचे सॅम्पल्स गोळा करण्यात आले होते. नवीन अभ्यासानुसार २८ हजार लोकांचा मृत्यू झाल्यानंतर आता स्पेनमध्ये ९५ टक्के लोकांना व्हायरसचा धोका आहे.
यूरोपियन सेंटर फॉर डिजीज कंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार युरोपातील अनेक देशांमध्ये आत्तापर्यंतचा हा सगळ्यात मोठा अभ्यास आहे. Lancet च्या अभ्यासानुसार जिनेवा सेंटर फॉर इमरजिंग वायरल डिजीजच्या प्रमुख इजाबेल एकरले आणि जिनेवा यूनिवर्सिटी वायरोलॉजिस्ट बेंजामिन मेयर यांनी सांगितले की, नैसर्गिक स्वरुपात हर्ड इम्युनिटी मिळवणं हे अशक्य आहे.
कोणत्याही व्यक्तीच्या शरीरात एंटीबॉडीज विकसित झाल्यानंतर त्या व्यक्तीला पुन्हा कोरोनाची लागण होणार नाही. याबाबात तज्ज्ञांमध्ये साशंकता आहे. व्हायरसशी लढण्यासाठी साधारपणे समाजातील ६० टक्के लोकांनी इम्युन विकसित होणं गरजेचं आहे.
युद्ध जिंकणार! भारतात कोरोनाची पहिली लस तयार होणार; जाणून घ्या 'या' १० महत्वाच्या गोष्टी
आता हवेतूनही होऊ शकतो कोरोनाचा प्रसार; खरंच सोशल डिस्टेंसिंगने संसर्गापासून बचाव होईल?