कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरासह भारतात सुद्धा झपाट्याने पसरत आहे. अनेक लोकांच्या मनात कोरोनाबद्दल गैरसमज आहेत. कोरोना इतर रोगांप्रमाणे बरा होणारा आहे. त्यामुळे जीवीताला काही धोका नाही असा समज अनेकांमध्ये आहे. म्हणून कोरोना व्हायरस आणि स्वाईन फ्लूमध्ये काय फरक आहे. ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कोरोना व्हायरसच्या उपचारांबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. हा व्हायरस एका व्यक्तीकडून इतर व्यक्तींकडे झपाट्याने पसरतो आणि साधारणपणे या आजाराची लक्षणं दिसण्यासाठी २ ते १४ दिवसांपर्यंतचा कालावधी लागू शकतो.
स्वाईन फ्लू H1N1 फ्लू संक्रमण श्वसनाशी निडगीत आजारांचे आहे. यामुळे एंफ्लुएंजा नावाचा व्हायरस शरीरात प्रवेश करत असतो. या आजाराची लक्षणं दिसायला ४ दिवस लागतात. स्वाईन फ्लु सुद्धा कोरोना व्हायरसप्रमाणे धोकादायक आहे. २००९ मध्ये स्वाईन फ्लूची सुरूवात २००९ मध्ये झाली. मॅक्सिकोनंतर तब्बल ७४ देशांत हा आजार पसरला. कोरोना व्हायरस आणि स्वाईन फ्लूची लक्षणं सामान्यपणे एकसारखीच आहेत. त्यामुळे सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.
कोरोनाची लक्षणं ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणं, उलटी होणं, नाकातून पाणी येणं, घसा खवखवणं. अशीच लक्षणं स्वाईन फ्लूची सुद्धा आहेत. स्वाईन फ्लूची लस आहे पण कोरोनाची नाही. स्वाईन फ्लूपासून बचाव करण्यासाठी बाजारात अनेक वॅक्सिन्स उपलब्ध आहेत.
तुलनेने कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी आत्तापर्यंत कोणतीही वॅक्सिन तयार करण्यात आलेली नाही. WHO च्यामते कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी अजून कोणतंही औषध आलेलं नाही. म्हणून अफवांवर विश्वास न ठेवणं फायद्याचे ठरणार आहे.