हे तर सर्वांनाच माहीत आहे की, कोरोना व्हायरसच्या जास्तीत जास्त रूग्णांमध्ये सामान्य लक्षणे दिसू लागतात. जसे की, सर्दी, खोकला आणि नाक वाहणे. पण तुम्हाला माहीत आहे का की, काही केसेसमध्ये सामान्य लक्षणांनंतर अचानक रूग्णाची स्थिती गंभीर होते. त्यामुळे सर्दी, ताप, खोकल्यासारख्या लक्षणांकडे जास्त दिवस दुर्लक्ष करणं घातक ठरू शकतं. कोरोना व्हायरसबाबत जगभरात वेगवेगळे रिसर्च केले जात आहेत. कारण या व्हायरसबाबत अजून सगळं माहीत नाही. आतापर्यंत 91 लाखांपेक्षा अधिक लोक संक्रमित झाल आहेत. तर 4 लाख 74 हजारपेक्षा जास्त लोकांचा याने जीव गेलाय.
7 ते 10 दिवसांनी गंभीर स्थिती
The University of Kansas Health System चे इन्फेक्शन प्रिव्हेंशन अॅन्ड कंट्रोल विभागाचे डायरेक्टर Dr. Dana Hawkinson सांगतात की, 'कोरोनाची लागण झाल्यानंतर काही लोकांमध्ये फार सामान्य लक्षणे दिसू लागतात. अनेकदा तर हे लोक 2 ते 7 दिवसात ठिकही होतात. पण काही केसेसमध्ये असं बघितलं जात आहे की, काही टेस्टआधी किंवा टेस्टनंतर रिकव्हर तर होत आहेत, पण नंतर 7 ते 10 दिवसांच्या आत अचानक गंभीरपणे आजारी पडत आहेत. हे सायकोटाइन स्टॉर्ममुळे होत आहे. जे मनुष्याच्या इम्यून सिस्टीमच्या चुकीमुळे होत आहे'.
काय आहे सायटोकाइन स्टॉर्म ज्यामुळे गंभीर होत आहेत रूग्ण?
हे तर तुम्हाला माहीत आहे कोरोनावर अजून कोणतीही लस नाही. त्यामुळे सध्या कोरोनासोबतची लढाई रूग्णांचं इम्यून सिस्टीमच लढत आहे. कोरोना मुख्यपणे फुप्फुसांवर हल्ला करतो त्यामुळे इम्यून सिस्टीम फुप्फुसातून व्हायरसला मारण्यासाठी हल्ला करतो, ज्याने सूज येते आणि व्हायरस हळूहळू नष्ट होतो. पण अनेक केसेस अशाही पाहिल्या जात आहेत की, काही व्यक्तींमध्ये इम्यून सिस्टीम ओव्हर रिअॅक्टिव होत आहे. ज्यामुळे अति गंभीर सूज येण्याची स्थिती तयार होते. ही स्थिती जीवघेणी ठरू शकते.
कशी घ्याल काळजी?
कोरोना व्हायरसच्या संपर्कात आल्यावर काही दिवसातच व्हायरस शरीर ताब्यात घेतो. अशात काही कॉमन कोल्डची लक्षणे दिसू शकतात किंवा अनेकदा लक्षणे दिसत नाहीत. आणि रूग्ण Asymptomatic असतो. 6 ते 7 दिवसातच ही सामान्य लक्षणे निमोनियात बदलू लागतात. निमोनियात लक्षणे बदलण्याचा अर्थ हा आहे की, व्हायरसने फुप्फुसांवर हल्ला केलाय. अशात काही लोकांना रक्तात ऑक्सीजनची कमतरता आल्याने श्वास घेण्यास अडचण येऊ शकते. तर काही लोकांना ऑक्सीजन कमी झाल्यावरही श्वास घेण्यास अडचण येत नाही. यांना “silent hypoxia” असे म्हटले जात आहे.
त्यामुळे कुणालाही वर दिलेली लक्षणे दिसत असतील तर त्यांनी अजिबात दुर्लक्ष करू नये. त्यांनी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्या.
- लक्षणे पूर्णपणे दिसायला अनेकदा 2 ते 14 दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे ताप, खोकला, सर्दी सारखी सामान्य लक्षणे असतील, तर स्वत:ला आयसोलेशनमध्ये ठेवा आणि दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येऊ नका.
- ताप जर सतत येत असेल आणि प्राथमिक औषधांनी 2 ते 3 दिवसात आराम मिळत नसेल तर जवळच्या कोविड सेंटरमध्ये जाऊन टेस्ट करावी.
- जर लक्षणे कमी झाल्याने तुमची टेस्ट केली जात नसेल तर, कमीत कमी हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याची व्यवस्था नेहमी तयार ठेवा.
ही लक्षणे दिसली तर वेळी हॉस्पिटलमध्ये पोहोचा...
- श्वास घेण्यास त्रास
- कन्फ्यूजन आणि कामावर लक्ष केंद्रीत होत नसेल तर
- छातीत दबाव किंवा वेदना होत असेल तर
- ओठ किंवा चेहऱ्यावर नीळसर डाग असेल तर...
अनेकदा सामान्य सर्दी, खोकला, ताप आल्यावर ही लक्षणे अचानक दिसू लागतात. तेच अनेकदा रूग्ण इतका कमजोर होतो की, त्याला फोनही उचलता येत नाही. त्यामुळे आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या लोकांनी आजूबाजूच्या लोकांच्या सतत संपर्कात राहणे गरजेचे आहे.
कानांमार्फतही होऊ शकते कोरोना विषाणूंची लागण? माहीत करून घ्या संक्रमणाबाबत फॅक्ट्स
Coronavirus : कोरोनाला मात देण्यासाठी नवी रणनीति Serological Survey, वाचा काय आहे हा सर्व्हे...