(image credit- financial express)
सध्या कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र भीतीचं वातावरण तयार झालं आहे. कोरोना व्हाययरचा संसर्ग होण्याचे अनेक प्रकार आहेत. त्यामुळे लोक संभ्रमात आहेत. हा व्हायरस ऑनलाईन शॉपिंगमुळे तसंच कोणत्याही वस्तुला स्पर्श केल्यामुळे तसंच शिंकल्या किंवा खोकल्यामुळे होतो. अशा अनेक चर्चा आहेत.
पण तुम्हाला माहित आहे का किराणासामान आणायला जात असताना तुम्ही त्यासोबत व्हायरससुद्धा घेऊन येऊ शकता. सरकारने लोकांचा कोरोनापासून बचाव करता यावा यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहिर केला आहे. आज आम्ही तुम्हाला व्हायरसपासून कसं सुरक्षित राहायचं याबाबत सांगणार आहोत.
लॉकडाऊनच्या दरम्यान तुम्ही राज्य सरकारने दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करून गरजेचं असलेलं सामान मागवू शकता. त्यासाठी तुम्ही स्टोरवर जाणं टाळायला हवं कारणं स्टोरवर अनेक लोक सामान आणण्याासाठी येत असतात. त्यामुळे स्पर्शाद्वारे इन्फेक्शन पसरण्याचा धोका अधिक असतो.
बिग बाजारसारखे अनेक लहान मोठे स्टोरर्स फोन आणि व्हाट्सएपवर ऑर्डर घेत आहेत. या सुविधेचा वापर करून तुम्ही सामान घरी आणू शकता. जर तुम्हाला गरजेच्या कामासाठी बाहेर पडायचं असेल तर मास्क लावणं गरजेचं आहे. घरातून बाहेर गेल्यावर किंवा बाजारात जात असाल तर सोशल डिस्टंसिंग पाळणं गरजेचं आहे. सगळ्यात जास्त सोपा उपाय म्हणजे सामान आणण्याासाठी डिजीटल पद्धतीचा वापर करा. ( हे पण वाचा- जगातले सगळ्यात महाभयंकर व्हायरस, कोरोनाच्या आधी यांनी घातलेलं थैमान)
कोणालाही हातात पैसै देऊन देवाण-घेवाण करण्यापेक्षा ऑनलाईन सामान मागवा. जर तुम्ही दूध, ब्रेड, अंडी, कोणतंही सामान आणायला जात असाल तरसोबत कापडाची पिशवी घेऊन जा. कारण त्यामुळे संक्रमणाची शक्यता कमी असेल. तसंच कापडी पिशवी तुम्ही धुवू सुद्धा शकता. ( हे पण वाचा- coronavirus : महिलांच्या तुलनेत पुरूष जास्त होताहेत कोरोनाचे शिकार? पण काय आहे कारण?)