सध्या कोरोना व्हायरसचं प्रमाण सर्वत्र वाढत असल्यामुळे कोरोना कशामुळे बरा होऊ शकतो याबाबत अनेक दावे केले जात आहेत. तसंच अनेक अफवा सुद्धा पसरवल्या जात आहेत. तसचं ऑनलाईन शॉपिंग आणि नोटांना स्पर्श केल्याने कोरोना पसरत असल्याच्या चर्चा रंगत आहेत.
अलिकडे कापूराच्या वापराने कोरोना व्हायरस निघून जातो. अशा अफवा पसरवल्या जात होत्या. घरात कापूर जाळल्यामुळे हवेतील कोरोनाचे विषाणू नष्ट होतात. असे अनेक समज गैरसमज प्रचलित आहेत. आज आम्ही तुम्हाला खरचं कापूराचा वापर केल्याने कोरोना नष्ट होतो का याबाबत सांगणार आहोत. ( हे पण वाचा-coronavirus : लठ्ठ लोकांना कोरोनापासून जास्त सावध राहण्याची गरज, जाणून घ्या रिसर्च काय सांगतो!)
कापूर किंवा कापराची वडी कित्येक वर्षांपासून हवा स्वच्छ, शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येत आहे. परंतु कापूर कोरोना व्हायरसशी लढू शकत नाही. कोरोना व्हायरस एक संसर्ग आहे, जो केवळ हवेच्या शुद्धीकरणाने मारला जाऊ शकत नाही. अशी माहिती राममनोहर लोहियामध्ये इंटरनल मेडिसीनचे माजी प्रमुख डॉ. मोहसिन वली यांनी दिली आहे. यासोबत योग्य ते उपाय करणं हेच अतिशय योग्य ठरेल असंही ते म्हणाले. ( हे पण वाचा-फक्त 'या' ५ पद्धतीने काळ्या मिरीचे सेवन करा आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवा)