भारतात सध्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातलं आहे. स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. सतत कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या वाढत आहे. डॉक्टर आरटी-पीसीआर टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळणाऱ्या लोकांना गरज नसेल तर हॉस्पिटलमध्ये भरती न होण्याचा सल्ला देत आहेत. कारण जास्तीत जास्त रूग्ण घरच्या घरीच बरे होत आहेत.
हॉस्पिटलमध्ये कधी भरती व्हावं?
केंद्र सरकारने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे निर्देशक डॉ. सीएस प्रमेश यांच्या सल्ल्यावर आधारिक काही सल्ले देण्यात आले आहेत. व्हिडीओमध्ये चांगल्य आहारासोबत. तरल पदार्थ घेणे, योगा करणे, कोविड पॉझिटिव्ह रूग्णांना आपला ताप आणि ऑक्सीजन लेव्हल ट्रॅक करण्याचा सल्ला दिला आहे. (हे पण वाचा ; Coronavirus चा धोका कमी करण्यासाठी तोंडाच्या स्वच्छतेवर द्या अधिक लक्ष, रिसर्चमधून दावा!)
किती असावी ऑक्सीजन लेव्हल?
व्हिडीओमध्ये जो संदेश देण्यात आला आहे की, जर तुमच्या शरीरात ऑक्सीजन लेव्हल ९४ पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज नाही. त्यासोबतच ऑक्सीजन लेव्हलचं योग्य प्रमाण मोजण्यासाठी आपल्या रूममध्येच सहा मिनिटे वॉक केल्यावर टेस्ट करण्याचा सल्ला दिला गेलाय. सहा मिनिटे चालल्यानंतर आणि आधीच्या ऑक्सीजन लेव्हलमध्ये ४ टक्के किंवा त्याहून अधिक चढ-उतार होत असेल तर हॉस्पिटलमध्ये संपर्क करण्याचा सल्ला दिला गेलाय.
कोणतं औषध घ्यावं?
व्हिडीओत सांगण्यात आले आहे की, रूग्णाची ऑक्सीजन लेव्हल ठीक असेल आणि तापाशिवाय दुसरी काही समस्या नसेल तर अशा रूग्णांना केव पॅरासिटामोल घेणे आणि आनंदी राहण्याची गरज आहे. तसेच त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज नाही.