वेगानं पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला असून रुग्णांची संख्या 30,984,415 वर गेली आहे. तर 961,400 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी, लस शोधण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी संशोधन सुरू असून नवनवीन माहिती ही सातत्याने समोर येत आहे. दरम्यान कोरोनाच्या उपचारांबाबत संशोधकांनी सकारात्मक एक दावा केला आहे.
रशियाची फार्मा कंपनी आर फार्मानं कोविड19 च्या उपचारांसाठी नवीन औषध तयार केलं आहे. हे एक नवीन एंटी व्हायरल औषध आहे. या औषधाला कोरोनाविर नाव देण्यात आलं असून वैद्यकिय चाचणीनंतर या औषधाला कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी परवागनी देण्यात आली आहे. रशियन कंपनीने केलेल्या दाव्यानुसार हे औषध कोरोना रुग्णांचे उपचार करण्यासाठी परिणामकारक ठरतं.
कोरोनाविर या औषधामुळे व्हायरसचे रेप्लिकेशन म्हणजेच संख्या वाढवण्यापासून रोखता येऊ शकतं. कंपनीनं केलेल्या दाव्यानुसार कोरोनाविर हे देशातील पहिले असे औषध आहे. ज्याद्वारे कोरोना रुग्णांचे उपचार केले जाऊ शकतात. जगभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशा स्थितीत या औषधामुळे संक्रमित रुग्णांमध्ये व्हायरसची संख्या वाढण्यापासून रोखता येऊ शकतं.
५५ टक्के सुधारणा दिसून आली
आर फार्मा कंपनीने केलेल्या दाव्यानुासर क्लिनिकल ट्रायल दरम्यान कोरोनाविर आणि दुसरी थेरेपी घेत असलेल्या कोरोना रुग्णांमध्ये तुलना करण्यात आली. रिपोर्टमध्ये दिसून आले की दुसरी थेरेपी घेत असलेल्या रुग्णांच्या तुलनेत कोरोनाविर घेत असलेल्या रुग्णांमध्ये 55 टक्के सुधारणा दिसून आली. तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार कोरोनाच्या लक्षणांपेक्षा या औषधानं आजाराच्या मुळावर घाव घातला जातो. हे औषध रुग्णांना दिल्यानंतर 14 दिवसांनंतर हा फरक दिसून आला. तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार कोरोनाविर दिल्यानंतर पाचव्या दिवशी 77.5 टक्के रुग्णांच्या शरीरात कोरोना व्हायरसचं संक्रमण कमी झालं होतं.
आर फार्माचे वैद्यकिय प्रमुख डॉ. मिखायल सोमसोनोव यांनी सांगितले की, अनेक देशांमध्ये वैद्यकिय परिक्षणाला सुरूवात झाली आहे. कोरोविर कोरोनाचं संक्रमण आणि रेप्लिकेशन रोखण्यासाठी प्रभावी ठरत आहे. रशियाच्या सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजीचे प्रमुख तात्यान रायदेनत्सोवा यांनी दिलेल्या माहितीनुसार मे महिन्यात या औषधांच्या चाचणीला सुरूवात झाली होती. आतापर्यंत ११० रुग्णांच्या उपचारांसाठी या औषधांचा वापर करण्यात आला आहे. या औषधाचे संशोधन अहवाल अजूनही प्रकाशित झालेले नाहीत. यावर तात्यान रायजेनत्सोवा यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.
कोणत्याही लसीशिवाय ३ देशांनी कोरोनावर 'अशी' केली मात
संपूर्ण जगभरात कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्कच्या वापरावर जोर दिला जात आहे. जपान, कोरिया आणि सिंगापूरसारख्या देशात मास्क वापरणं सक्तीचं करण्यात आलं आहे. याचा परिणाम चांगला दिसून आला आहे. न्यू इंग्लँड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये मागील काही दिवसात छापण्यात आलेल्या माहितीनुसार कापडापासून तयार केलेला मास्क सावधगिरीनं वापरल्यास लसीप्रमाणेच प्रभावी ठरू शकतो. हे एक आंतरराष्ट्रीय नियतकालीक आहे.
जेव्हा मोठ्या प्रमाणात मास्कचा वापर केला जातो तेव्हा संक्रमित व्यक्तींच्या शरीरातून कोरोना व्हायरसचे ड्रॉपलेट्स खूप कमी प्रमाणात वातावरणात एकत्र होतात. जेव्हा कमी प्रमाणात ड्रॉपलेट्स वातावरणात एकत्र होतात आणि आजूबाजूच्या लोकांनी मास्क लावलेला असतो. तेव्हा शरीरात कमी प्रमाणात व्हायरसचं संक्रमण पसरतं. यामुळे गंभीर स्वरुपाचं संक्रमण होण्यापासून वाचता येऊ शकतं.
अशा स्थितीत जेव्हा कोणच्याही व्यक्तीच्या शरीरात नवीन व्हायरसचा प्रवेश होतो. तेव्हा शरीरात व्हायरसचा लोड कमी असतो. त्यावेळी रोगप्रतिकारकशक्ती व्हायरसला ओळखून लढण्यासाठी एंटीबॉडी तयार करण्यासाठी आणि व्हायरसला नष्ट करण्यासाठी पूर्ण वेळ घेते. म्हणून न लसी तयार होत नाही तोपर्यंत कोरोनावर यशस्वीरित्या मात करण्यासाठी मास्कचा वापर प्रभावी ठरू शकतो.
हे पण वाचा-
तुम्हालाही अचानक BP चा त्रास होतो? तज्ज्ञांनी सांगितले 'बीपी' नियंत्रणात ठेवण्याचे सोपे उपाय
भारतातही कोरोनाची लस मोफत मिळणार? अमेरिकेने केली मोठी घोषणा
आरोग्यदायी दुधीच्या सालीचे 'हे' फायदे वाचाल; तर फेकून देताना १० वेळा विचार कराल
काळजी वाढली! अजून २ वर्ष कोरोनाच्या माहामारीपासून सुटका नाही; WHO च्या तज्ज्ञांचा दावा
मोठा दिलासा! कोरोनाच्या लढाईत शास्त्रज्ञांना यश; बनवलं कोरोनावर मात करणारं Ab8 औषध