नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तीन कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,94,720 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 442 जणांचा मृत्यू मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल साडे चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा 4,868 वर पोहोचला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र असं असताना कोरोनाचं हलकं इन्फेक्शन हे घातकं ठरू शकतं. छोट्या चुकांकडे दुर्लक्ष केल्यास ते जीवावर देखील बेतू शकतं. सध्या कोरोनाचा धोका वाढल्याने वेळीच सावध होणं अत्यंत गरजेचं आहे.
करू नका 'या' 8 गोष्टी
- कोरोनाबाबत जागरुक राहणं अत्यंत गरजेचं आहे. कोरोनाच्या सामान्य आणि गंभीर लक्षणांवर बारीक नजर ठेवा. वायरल किंवा एलर्जी असं समजून उपचार करून नका. इन्फेक्शनशी संबंधित लक्षणं दिसतात तातडीने कोरोनाची चाचणी करून घ्या. वेळेत संसर्गाबाबत माहिती मिळाल्यास कोरोनाचा प्रसार होणार नाही.
- अपोलो रुग्णालयाचे सीनियर कन्सल्टेन्ट डॉ, सूरणजीत चॅटर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमायक्रॉन रुग्णांना पहिले तीन दिवस घसा दुखतो तसेत ताप येतो. अंग देखील दुखतं. पण अँटीबाय़ोटिक औषध न घेताच ते तीन दिवसात बरे होतात. त्यामुळे घरी असलेल्या रुग्णांनी अँटीबाय़ोटिक औषध घेण्याची गरज नाही.
- कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांनी स्वत:ला घरीच आयसोलेट करा. ड़ॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्या आणि त्यानुसार उपचार करा. स्वत: च्या मर्जीने औषधं घेऊ नका कारण ते जीवघेणं ठरू शकतं.
- अनेक जण कोरोनाची लागण झाल्यावर देखील डॉक्टरांकडे जात नाहीत. पण असं करून नका. वेळीच सल्ला घेतल्यास तुम्ही लवकर बरे होऊ शकता. तसेच तुम्हाला होणारा त्रास देखील कमी होण्यास मदत होईल.
- काही जण चाचणी करण्यासाठी खूप उशीर करतात. तो पर्यंत आपल्या शरीरात वेगाने कोरोनाचं संक्रमण झालेलं असतं. त्यामुळे थोडी जरी लक्षणं आढळून आली तर पटकन चाचणी करून घ्या आणि आयसोलेशनमध्ये राहा.
- जर तुम्हाला पाच दिवसांहून अधिक दिवस ताप येत असेल आणि लक्षणं जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हाय बीपी किंवा डायबिटीस असलेल्या रुग्णांवर त्याचा अधिक परिणाम होऊ शकतो. म्हणूनच अशा रुग्णांनी सतर्क राहा.
- कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर लोक स्वत:ला आयसोलेट करतात. पण असं करून नका. लक्षणं आढळताच आयसोलेट व्हा. जेणेकरून घरातील इतर सदस्यांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही.
- हलक्या लक्षणांपासून कोरोनाची सुरुवात होते. त्यामुळे हलक्या लक्षणांकडे देखील गांभीर्याने पाहा आणि वेळीच उपाय करा. साधा सर्दी खोकला आहे असं म्हणून टाळू नका असा सल्ला ड़ॉक्टरांनी दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.