नवी दिल्ली - जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. आशिया आणि युरोपमधील अनेक देश कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या विळख्यात आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारतात नव्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. कोरोनाचे नियम शिथिल होताच अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाचा प्रसार होत आहे. आयआयटी कानपूर संशोधकांनी असा अंदाज वर्तवला आहे की, कोरोनाची चौथी लाट भारतात जूनमध्ये धडकू शकते. गेल्या काही दिवसांपासून ज्या प्रकारे नवीन केसेसमध्ये वाढ होत आहे, त्यावरून त्यांचे म्हणणे खरे ठरत आहे.
दिल्ली, केरळ, महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, मिझोराम यासारख्या अनेक राज्यांमध्ये नवीन प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाचे नवीन प्रकार Omicron BA.1, Omicron BA.2 आणि XE प्रकाराने कहर माजवला आहे. हे कोरोनाचे सर्वात वेगाने पसरणारे व्हेरिएंट आहेत. त्यांची अनेक प्रकरणे भारतातही पाहायला मिळाली आहेत. कोरोनाचे नवीन प्रकार त्यांच्यासोबत नवीन लक्षणेही घेऊन येत आहेत. चौथ्या लाटेपूर्वी ही लक्षणे समजून घेणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे.
मोठ्या माणसांमध्ये दिसणारी कोरोनाची लक्षणे
यूके हेल्थ एजन्सी NHS च्या मते, मोठ्या माणसांमध्ये कोरोनाची पुढील लक्षणे दिसतात.
- अंग थरथरण्यासोबतच ताप येणे, छाती किंवा पाठीला स्पर्श केल्यावर जाणवू शकतो- दिवसातून तीन वेळा ते सुद्धा एक किंवा तीन तास सतत होणारा खोकला- वास किंवा चव कमी होणे किंवा बदलणे- श्वासाची कमतरता- थकवा जाणवणे- अंगदुखी- डोकेदुखी- घसा खवखवणे- नाक वाहणे- भूक न लागणे- जुलाब- आजारी वाटणे किंवा आजारी असणे
मुलांमध्ये दिसणारी कोरोनाची लक्षणे
यूके हेल्थ एजन्सी NHS च्या मते, लहान मुलांमध्ये कोरोनाची पुढील लक्षणे दिसतात -
- ताप येणे, सोबत अंग थरथरणे किंवा थंडी वाजून येणे- एक विचित्र आणि सततचा खोकला- वास किंवा चवीमध्ये बदल होणे किंवा कमतरता येणे- श्वास घेण्यास समस्या - नेहमी थकवा जाणवणे- अंगदुखी- डोकेदुखी- घसा खवखवणे- नाक वाहणे- भूक न लागणे- जुलाब- आजारी वाटणे किंवा आजारी असणे
लहान मुलांमध्ये आणि वयस्कर लोकांमध्ये दिसणारी कोरोनाची सामान्य लक्षणे फ्लूच्या लक्षणांसारखीच असतात, त्यामुळे तुम्हाला वरीलपैकी कोणतीही लक्षणे जाणवल्यास तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.