जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. काही देशांमध्ये कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. चीन, फ्रान्ससह अनेक देशांमध्ये नवीन प्रकरणांमध्ये पुन्हा वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या देशांतील वाढती प्रकरणे ही लोकांसाठी चिंतेची बाब आहे. कोरोनाच्या ओमाक्रॉन व्हेरिएंटचा सब व्हेरिएंट BA.2 चौथ्या लाटेचा इशारा देत आहे. त्याचवेळी, आता WHO ने कोरोना व्हायरसचा नवीन प्रकार XE बद्दल सांगितले आहे. हा प्रकार Omicron च्या BA.1 आणि BA.2 या दोन प्रकारांनी बनलेला आहे. हा नवा प्रकार BA.2 पेक्षा 10 टक्के जास्त संसर्गजन्य असल्याचा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केला आहे.
यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सी (UKHSA) ने कोरोना व्हायरस लक्षणांची अधिकृत यादी अपडेट केली आहे. या यादीत 9 नवीन लक्षणे जोडली गेली आहेत. कोरोना वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करत आहे. कोरोनाशी संबंधित सामान्य लक्षणांबद्दल बोलायचे झाल्यास, त्यात ताप, खोकला, थकवा, चव न समजणं किंवा वास न येणं इत्यादींचा समावेश होतो. तथापि, एनएचएस (एनएचएस) ने इशारा दिला आहे की नवीन लक्षणे सर्दी आणि फ्लूच्या लक्षणांसारखीच आहेत. कोरोनाच्या नवीन लक्षणांबद्दल जाणून घेऊया...
कोरोनाशी संबंधित 'ही' आहेत 9 नवीन लक्षणे
- भूक न लागणे- घसा खवखवणे- डोकेदुखी- अंगदुखी- थकवा जाणवणे- अतिसार होणे- नाक वाहणे- आजारी वाटणे- श्वास घेण्यास त्रास होणे.
कोरोनाच्या चौथ्या लाटेत दातांना मोठा धोका, 'या' 6 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
कोरोनाच्या चौथ्या लाटेत दातांना मोठा धोका निर्माण झाला आहे. फुफ्फुस, पोट यानंतर आता कोरोना दातांवर अटॅक करत असल्याचं समोर आलं आहे. कोरोनामुळे दात आणि हिरड्यांचेही नुकसान होत आहे, ज्याची लक्षणे दिसू लागली आहेत, त्याला 'कोविड टीथ' असं नाव दिलं जात आहे, असे आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेपूर्वी ही लक्षणे समजून घेणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. हिरड्यांमध्ये वेदना, जबडा किंवा दात दुखणे, हिरड्यांमध्ये रक्त जमा होणं, ताप, खोकला, थकवा ही सहा लक्षणं दिसल्याचं वेळीच सावध व्हा. दात किंवा हिरड्याचे दुखणे कोणालाही त्रास देऊ शकते, परिस्थितीत वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.