शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
2
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
3
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
4
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
5
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
6
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
7
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
8
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
9
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
10
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
11
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
13
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम
14
शायना एनसींना इम्पोर्टेड माल म्हटल्याबद्दल अरविंद सावतांनी मागितली माफी; म्हणाले, "जाणूनबुजून मला..."
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सांगलीत महायुतीला मोठा दिलासा! सम्राट महाडिकांचा यू-टर्न, अपक्ष अर्ज माघार घेणार; सत्यजीत देशमुखांचा प्रचार करणार
16
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग
17
Bad Luck! कोहलीच्या बॅटनं खेळण्याची हुक्की; Akash Deep वर ओढावली Diamond Duck ची नामुष्की!
18
कॅनडाचे जस्टीन ट्रुडो सरकार सुधरेना! भारताचा 'सायबर धोकादायक' देशांच्या यादीत केला समावेश
19
निवडणूक आयोगाची भलतीच डोकेदुखी; एका मतदारसंघात प्रत्येक बुथवर लावावी लागणार ९ EVM
20
एकच आमदार असणाऱ्यांविषयी...; राज ठाकरेंच्या टीकेनंतर शरद पवारांकडून खरपूस समाचार!

CoronaVirus News : ब्लड प्रेशर असलेल्या कोरोनाग्रस्तांना 'ही' चूक पडेल महागात; वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 8:35 AM

CoronaVirus Marathi News and Live Updates: मधुमेह, उच्च रक्तदाब यासह काही आजार असलेल्या रुग्णांना कोरोना व्हायरसचा धोका जास्त आहे. हाय ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी केलेली एक चूक त्यांच्याच जीवावर बेतू शकते.

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. जगातील सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या ही तब्बल 70 लाखांवर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 406,126 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 7,086,465 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. कोरोनावर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. जगभरात युद्धपातळीवर लस शोधण्याचं काम सुरू आहे. अनेक देशांमध्ये संशोधन केलं जात आहे.

विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी कोरोना संकटाच्या काळात विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब यासह काही आजार असलेल्या रुग्णांना कोरोना व्हायरसचा धोका जास्त आहे. हाय ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी केलेली एक चूक महागात पडू शकते, त्यांच्याच जीवावर बेतू शकते. अशा कोरोना रुग्णांनी जर त्यांची बीपीवरील औषधं घेणं थांबवलं तर त्यामुळे त्यांना मृत्यूचा धोकाही जास्त आहे. कोरोना व्हायरसमुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो अशी माहिती एका संशोधनातून आता समोर आली आहे. 

कोरोनाचा धोका हा इतराच्या तुलनेत उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना अधिक आहे. शीजिंग हॉस्पिटलमधील शास्त्रज्ञांनी काही रुग्णांचा अभ्यास केला. युरोपियन हार्ट जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. 5 फेब्रुवारी ते 15 मार्चदरम्यान 2,866 रुग्णांच्या केलेल्या या अभ्यासात संशोधकांना दिसून आलं आहे. संशोधनानुसार, रक्तदाब असलेल्या  850 पैकी 34 म्हणजे 4% कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर उच्च रक्तदाब नसलेल्या 2027 पैकी 22 म्हणजे 1.1 टक्के कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.

ब्लड प्रेशरचं औषधं न घेणाऱ्या 140 पैकी 11 म्हणजे जवळपास 8% रुग्णांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला. तर दुसरीकडे औषधं घेणाऱ्या 710 पैकी 23 म्हणजे 3.2% कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याची औषधच कोरोना रुग्णांना संरक्षण देत असल्याचं संशोधकांना दिसून आलं. इतर कोरोना रुग्णांच्या तुलनेत उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांचा मृत्यू होण्याचा धोका अधिक आहे असं संशोधनात म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : लढ्याला यश! भारताने विकसित केलं स्वस्त कोरोना चाचणी किट; अवघ्या 20 मिनिटांत मिळणार रिझल्ट

मद्यप्रेमींसाठी खूशखबर! दारू स्वस्त होणार, 'कोरोना शुल्क' हटवणार; 'या' सरकारने घेतला निर्णय

Today's Fuel Price : 80 दिवसांत पहिल्यांदा झाली पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ; जाणून घ्या नवे दर

30 जून आधी पूर्ण करा 'ही' 7 महत्त्वाची कामं, नाहीतर होईल मोठं नुकसान

CoronaVirus News : ...म्हणून कोरोना पॉझिटिव्ह महिलेने बाळाचं नाव ठेवलं 'सॅनिटायझर'

CoronaVirus News : शिक्षणासाठी काय पण! 'या' मुलीच्या जिद्दीला तुम्हीही कराल सलाम

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यResearchसंशोधनhospitalहॉस्पिटलDeathमृत्यूmedicinesऔषधं