कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेक धडे दिले आहेत. कोरोना टाळायचा असेल तर सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क यांचे काटेकोर पालन करण्याबरोबरच कोरोनाप्रतिबंधक लस घेणेही गरजेचे असल्याचे दुसऱ्या लाटेने ठळकपणे अधोरेखित केले. लसीकरणाने पुन्हा कोरोनाची बाधा होणार नाही, असे नाही. परंतु निदान त्याची तीव्रता कमी असेल. लसीकरणानंतरही कोरोनाची लक्षणे आढळू शकतात, हे महत्त्वाचे.
लसीकरण झालेल्यांमधील लक्षणे कमी तीव्र असतात का?
लसीकरण झालेल्यांना कोरोनाची तीव्र किंवा गंभीर लक्षणे आढळणे दुर्मीळ असते. लसवंतांना कोरोनाची बाधा झालीच तरी रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येईलच असे नाही. मात्र, काही घटनांमध्ये लसीकरण झालेल्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले आहे.
आणखी काय असू शकतात लक्षणे ?डोकेदुखीनाक गळणेशिंका येणेघशाला सूजचव किंवा वास न येणे
थेट संसर्गकोरोनाप्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यास थेट संसर्ग होण्याचा धोका असतो.लसीकरण होऊनही बाधा झालेल्या व्यक्तीत कोरोनाची कोणतीही लक्षणे न दिसण्याची किंवा सौम्य लक्षणे दिसण्याची शक्यता असते. मात्र, थेट बाधेचे हे प्रमाण कमी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
लसवंतांकडून कोरोनाचा प्रसार होतो का?
लसवंतांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो आणि त्यांच्याकडून कोरोनाचा प्रसारही होऊ शकतो. मात्र, त्याचे प्रमाण कमी आहे.लसीकरण झालेल्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण दुर्मीळ आहे. डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वाढल्याने लसवंतांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता बळावली आहे. कोरोनाच्या पराभवासाठी लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे आहे.