जगभरात आतापर्यंत ८ कोटी ५५ लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोना संक्रमणाचा सामना करावा लागला आहे. आतापर्यंत १८ लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनामुळे मृत्यूचा सामना करावा लागला आहे. ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे संपूर्ण जगभरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. व्हायरसचा हा नवीन स्ट्रेन अधिक संक्रामक असल्याचे सांगितले जात आहे. अशा स्थितीत वैज्ञानिकांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण जगभरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. नायजेरियन वैज्ञानिकानं दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसची अजून नवीन रुपं समोर येऊ शकतात.
रिपोर्ट्सनुसार नायजेरियाचे वैज्ञानिक ओमिलाबू यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला पाहून वेगवेगळ्या प्रकारच्या कोरोनाच्या स्ट्रेनचा प्रसार होऊ शकतो असे सांगितले आहे. याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी आनुवांशिक विश्लेषण केलं आहे. जेणेकरून संक्रमण पसरण्यापासून रोखता येऊ शकतं.
ओमिलाबू यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत कोरोना व्हायरसचे नवीन स्ट्रेन सापडले आहेत. नायजीरियामध्येही नवीन स्ट्रेन दिसून आला आहे. व्हायरसचे रूपांतर वेगळ्या स्वरूपात करणे ही एक विलक्षण गोष्ट नाही. आपल्याला मन शांत ठेवावे लागेल, कारण संक्रमणाची आणखी नवे प्रकार समोर येत आहेत. आजार नियंत्रण व व्यवस्थापनासाठी आफ्रिका केंद्रांनी रविवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार नायजेरियात 89,163 लोकांना कोरोना संसर्ग झाला असून त्यापैकी 1,302 लोकांचा मृत्यू झाला आहे.
दिलासादायक! कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला वेगळं करणारा भारत जगातील पहिला देश; : ICMR
ओमिलाबू हे 'लागोस युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिसिन अँड टीचिंग हॉस्पिटल' मधील 'सेंटर फॉर ह्यूमन अँड जेनेटिक व्हायरोलॉजी' चे संचालक आहेत. ओमिलाबू म्हणतात की, ''नायजेरियात संसर्गाची नवीन प्रकरणे वाढत आहेत, परंतु इथल्या लोकांना कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे संसर्ग झाल्याचे अद्याप कळू शकले नाही. संसर्ग देशात पूर्वीपेक्षा वेगाने पसरत आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी अजून संशोधन आवश्यक आहे.''
अलर्ट! आता भारतातही वेगानं होतोय बर्ड फ्लूचा प्रसार; जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,03,40,470 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,49,649 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 16,505 नवे रुग्ण आढळले आले असून 214 जणांचा मृत्यू झाला आहे.