कोरोना विषाणूंमुळे संक्रमित होत असेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनामुळे २ कोटी ५८ लाख लोक संक्रमित झाले आहेत. मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या माहामारीला नियंत्रणात आणण्यासाठी लस तयार करण्याचे काम वेगानं सुरू आहे. इतर देशांप्रमाणेच भारतातही लस तयार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासानुसार स्वस्त स्टेरॉइड गंभीर स्थितीतील कोरोना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी परिणामकारक ठरू शकतं.
जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार या स्टेरॉइट औषधांचा वापर फक्त गंभीर स्थितीतील रुग्णांच्या उपचारांसाठी केला जातो. सुरुवातीच्या सौम्य लक्षणांसाठी रुग्णांवर या औषधानं उपचार न करण्याचा सल्ला दिला जात आहे. अमेरिकन मेडिकल असोशियेशनचे संपादक हावर्ड सी बाऊचर यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची गंभीर लक्षणं दिसत असलेल्या रुग्णांसाठी हे औषध प्रभावी ठरत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार वेगवेगळ्या ठिकाणी आतापर्यंत १७०० कोरोना संक्रमित रुग्णांवर ३ प्रकारच्या स्टेरॉइड औषधांची चाचणी करण्यात आली आहे. या चाचणी दरम्यान दिसून आलं की स्टेरॉइटच्या वापरामुळे गंभीर स्थितीतील कोरोना रुग्णांमध्ये मृत्यूचा धोका कमी झाला होता. डेक्सामेथासोन्स, हायड्रोकार्टीसोन आणि मिथायलप्रेडिसोलोन यांसारख्या स्टेरॉइड औषधांचा वापर रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी, सूज आणि वेदना कमी करण्यासाठी केला जातो.
स्टेरॉइड एका प्रकारचे केमिकल आहे . हे माणसाच्या शरीरात तयार होते. स्टेरॉइडला वेगळ्या औषधाच्या नावानं ओळखलं जातं. मासपेशींच्या विकासासाठी या औषधाला परिणामकारक समजलं जात आहे. अनेकजण आपली शरीरयष्टी प्रभावी होण्यासाठी स्टेरॉईड्सचे सेवन करतात. पण कोणत्याही स्पर्धेत भाग घेण्याआधी स्टेरॉइटचा वापरावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. अधिकवेळा स्टेरॉइडचा वापर केल्यानं गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे लोकांना सर्दी, खोकला, ताप असं इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. अनेकदा स्टेरॉईड्चा अतिवापर करणं जीवघेणंही ठरू शकतं. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही औषधांचे सेवन करू नका.
भारतात कोरोनाची 2 सर्वात स्वस्त औषधं आली; एक टॅब्लेट 55 रुपयांना
एफडीसी लिमिटेड कंपनीनं कोविड 19 च्या फेविपीरावीर या औषधाचे दोन वेरिएंट लॉन्च केले आहेत. त्यातील एका औषधांचे नाव पीएफएफएलयू आणि फेविंजिया आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर सौम्य लक्षणं दिसत असलेल्या रुग्णांना हे औषध दिलं जाणार आहे. लाईव्ह मिंटच्या रिपोर्टनुसार एफडीसीनं दिलेल्या माहितीनुसार ड्रग कंट्रोल ऑफ इंडीया डीजीसीआयनं फेविपीरावीरच्या वापराला मंजूरी दिली आहे. हे एक ओरल एंटीव्हायरल औषध आहे. कोरोना व्हायरसची हलकी, मध्यम आणि सौम्य स्वरुपातील लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी हे औषध प्रभावी ठरलं आहे.
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार येत्या काळात हे औषध संपूर्ण भारतभरात हे औषध उपलब्ध होणार आहे. या औषधाच्या एक टॅबलेटची किंमत 55 रुपये इतकी आहे. एफडीसीचे मुख्य प्रवक्ता मयंक टिख्का यांनी दिलेल्या माहितीनुसार ही औषध लॉन्च झाल्यामुळे कोरोना रुग्णांची स्थितीत गंभीर होण्यापासून वाचवता येऊ शकतं. सरकार आणि आरोग्य सेवेतील तज्ज्ञांसोबत मिळून या औषधाचे उत्पादन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हे पण वाचा-
'कोरोनाच्या लसीबाबत खोट्या आशा अपेक्षा दाखवू नका'; आरोग्य तज्ज्ञांचे PM मोदींना पत्र
coronavirus: अशा ठिकाणी अधिक वेगाने पसरतो कोरोना विषाणू, संशोधनातून समोर आली माहिती