मास्कचा वापर कोरोना व्हायरसपासून बचावासाठी फायदेशीर ठरत असून फेस मास्कच्या प्रभावशिलतेबाबत करण्यात आलेल्या संशोधनातून दावा करण्यात आला आहे. मास्कचा व्यापक वापर कोरोनाप्रमाणेच १३ व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी फायदेशीर ठरतो. मंगळवारी द लॅसेंट या वैद्यकिय नियकालिकात हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं होतं. या अध्ययनात १३ वर्ष आणि यापेक्षा अधिक वयाच्या तीन लाखांपेक्षा अधिक लोकांसह अमेरिकेतील मास्कच्या वापराबाबत सर्वेक्षण करण्यात आले होते.
या संशोधनात सहभागी असलेल्या लोकांना विचारण्यात आलं हो की, सार्वजनीक ठिकाणी, किराणा सामान खरेदी करताना किंवा मित्र आणि कुटुंबीयांकडे जाताना मास्कचा वापर करायला हवा की नाही. त्यावेळी या उत्तरात ८५ टक्के लोकांनी सांगितले की, किराणा सामान खरेदी करताना मास्क वापरणं गरजेचं आहे. ४० टक्के लोकांनी तसंच कुटुंबातील लोकांनीसुद्धा मास्कचा वापर करायला हवा याबाबत आपले मत व्यक्त केले.
गेल्या डिसेंबरमध्ये मास्कशी संबंधित संशोधनातून दिसून आले की, संक्रमणापासून बचावासाठी मास्कचा वापर करणं गरजेचं आहे. त्यासाठी सामाजिक अंतर ठेवणं गरजेचं असून नियमांचेही पालन करायला हवे. हा शोध फिजिक्स ऑफ फ्लूईड नावाच्या पत्रकात प्रकाशित करण्यात आला होता.
या व्यतिरिक्त गेल्या नोव्हेंबरमध्ये भारतानं मास्क आणि सोशल डिस्टेंसिंगबाबत एक संशोधन प्रकाशित केले होते. हे संशोधन आयआयटी भुवनेश्वरच्या विद्यार्थ्यांनी केले होते. या अध्ययनात दिसून आलं की मास्कचा वापर शिंकताना केल्यास हे थेंब २५ फूटांपर्यंत लांब उडू शकतात. सुक्ष्मकण मास्कमधून बाहेर पडण्याची शक्यता असते. विशेषज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार अशा स्थितीत दोन मीटरचं अंतर ठेवणं गरजेचं असतं.
नवीन स्ट्रेन आधीच्या रुग्णांनाही संक्रमित करणार?
कोरोना संक्रमणाचा सामना केलेल्या लोकांना पुन्हा एकदा कोरोना संक्रमणाचा सामना करावा लागू शकतो. कोरोना संक्रमणानंतर शरीरात ज्या एंटीबॉडी तयार होतात. त्या ५ ते ६ महिने सक्रिय राहतात. यादरम्यान कोरोना व्हायरसने शरीरात प्रवेश केल्यानंतर एंटीबॉडीमध्ये उपस्थित प्रोटीन्स बांधून ठेवतात. त्यामुळे शरीरात कोरोना विषाणू पसरू शकत नाही.
कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमध्ये असं काहीही होत नाही. कोरोनाचा नवीन स्ट्रेन शरीरात उपस्थित असलेल्या एंटीबॉडीच्या प्रोटीन्समधील स्पाईक न्यूट्रीलायजर्समध्ये प्रतिरोधी क्षमता विकसित करतात. त्यानंतर एँटीबॉडीजवर परिणाम होतो. याच कारणामुळे कोरोना व्हायरसच्या संक्रमणातून बरं झाल्यानंतरही लोक दुसऱ्या स्ट्रेनने संक्रमित होऊ शकतात.
रोज झोपण्याआधी गरम दुधासह गुळाचे सेवन कराल; तर 'या' ५ समस्यांसाठी दवाखान्यात जाणं विसराल
वैज्ञानिकांनी यावर एक रिसर्च केला होता. त्यानुसार अर्ध्या लोकांच्या रक्तांच्या नमुन्यांमध्ये दिसून आले की, शरीरातील एंटीबॉडी नवीन स्ट्रेनशी लढण्यासाठी हवी असलेली क्षमता गमावतात. त्यामुळेच पुन्हा संक्रमित होण्यापासून वाचवलं जाऊ शकत नाही. या चाचणीत सहभागी असलेल्या लोकांच्या रक्तात एंटीबॉडीजचा स्तर कमी झाल्याचे दिसून आले.