कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. ब्रिटीश तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार लहान मुलामध्ये उलट्या, अतिसार, पोटातील वेदना अशी कोरोनाची लक्षणं असू शकतात. क्वींस युनिवर्सिटी बेलफास्ट लहान मुलांवर रिसर्च करत आहेत. यानुसार सध्याच्या परिस्थिीत कोरोना व्हायरसच्या लक्षणांमध्ये या तीन लक्षणांचा समावेश झाला आहे. ताप, खोकला, चव न समजणं, वास न येणं अशी लक्षणं कोणत्याही व्यक्तीमध्ये असल्यास आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला दिला जातो. तसंच त्यांची चाचणी सुद्धा केली जाते. ब्रिटनच्या तज्ज्ञांनी लहान मुलांवर केलेल्या रिसर्चमधून एक खुलासा झाला आहे.
या रिसर्चसाठी जवळपास १ हजार लहान मुलांना सहभागी करून घेण्यात आलं होतं. मेडरेक्सिमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या या अभ्यासानुसार ९९२ लहान मुलांपैकी ६८मुलांच्या शरीरात व्हायरशी लढत असलेल्या एंटीबॉडीज दिसून आल्या होत्या. १० मुलांमध्ये कोरोनाची लक्षणंही दिसून आली. त्यापैकी कोणालाही रुग्णालयात भरती करण्याची वेळ आली नाही.
या संशोधनाचे प्रमुख डॉ. टॉम वाटर फील्ड यांनी सांगितले की, व्हायरसमुळे लहान मुलांना तीव्रतेने त्रास झाला नाही ही चांगली गोष्ट आहे. पण या मुलांमध्ये अतिसार आणि उलट्या ही लक्षणं दिसून आली होती. या लक्षणांना कोरोना लक्षणांच्या यादीमध्ये जोडण्याचा आम्ही विचार करत आहोत. अमेरिकेतील सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोलनं कोविड १९ च्या लक्षणांमध्ये मळमळणं, उलट्या होणं, अतिसार या लक्षणांना सहभागी करून घेतलं आहे. आधीही ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्विसनं कोरोना व्हायरसच्या तीन लक्षणांवर लक्ष केंद्रित केले होते.
तीन लक्षणं
सतत खोकला येणं: एका तासापेक्षा जास्त वेळा खोकला येत असेल आणि ही समस्या २४ तासांच्या आता बरी झाली नाही तर आजारात रुपांतर होऊ शकतं.
ताप- या व्हायरसमुळे शरीराचं तापमान 37.8 डिग्री सेल्सियसपर्यंत वाढतं. त्यामुळे अंग गरम होऊन थंडी वाजते.
वास न येणं, चव न समजणं- तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ताप आणि खोकल्या व्यतिरिक्त व्हायरसच्या संक्रमणामुळे या दोन समस्याही उद्भवतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.
अमेरिकेतील सेंटर फॉर डिजीस कंट्रोल एंड प्रीवेंशन (सीडीसी)नं दिलेल्या माहितीनुसार ताप येणं, थंडी वाजून शरीर कापणं, मासपेशींमधल्या वेदना, घसा खराब होणं ही कोरोनाच्या संक्रमणाची लक्षणं आहेत. काही लोकांमध्ये ५ दिवस अनेकांमध्ये १४ दिवसांपर्यंत ही लक्षणं दिसतात. आराम केल्यानं आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं पॅरोसिटामोल घेतल्यानंतर रुग्ण बरा होऊ शकतो. जेव्हा रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होत असेल तेव्हा डॉक्टरांकडून तपासणी करून रुग्णाला व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनची किती आवश्यकता आहे. याबाबत माहिती घेतली जातो.
हे पण वाचा-
दिलासादायक! जॉनसन अॅण्ड जॉनसनची 'नोवावॅक्स' लस ठरली सुरक्षित; चाचणीनंतर तज्ज्ञांचा दावा
coronavirus: कोरोना लसीसाठी कोव्हॅक्स योजना, ७६ देश सहभागी
'या' ६ प्रकारच्या समस्या असल्यास नुकसानकारक ठरू शकतं हळदीचं सेवन; वेळीच तब्येत सांभाळा