Happy Hypoxia Symptoms: हॅप्पी हायपोक्सिया, या नावाच्या आधी हॅप्पी जोडलं गेलं असल्याने असं वाटतं काहीतरी चांगलं असणार. पण असं अजिबात काही चांगलं वगैरे नाही. हा शब्द कोरोना महामारी संबंधित आहे जो मनुष्यांसाठी घातक ठरत आहे. हे कोरोनाचं एक नवं लक्षण आहे. ज्याला Happy Hypoxia Symptoms असं नाव देण्यात आलं आहे.
कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत हॅप्पी हायपोक्सिया आजार नवी समस्या बनून समोर येत आहे. हे कोरोनाचं एक असं लक्षण आहे ज्यात ना श्वास घ्यायला त्रास होत ना थकवा जाणवतो. पण हॅप्पी हायपोक्सिया चोरून चोरून आपलं काम करत राहतो. इतकंच काय तर या लक्षणामुळे रूग्णाच्या ऑक्सीजन कमी झालं हेही समजणार नाही. (हे पण वाचा : CoronaVirus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना वाचवायचे असेल तर...; डॉक्टरांनी दिला महत्वाचा सल्ला)
कोविड हॉस्पिटलमध्ये याने पीडित काही रूग्ण समोर आले आहेत. या रूग्णांना कोणतीही लक्षणे नव्हती. मग एकाएकी त्यांचं ऑक्सीजन कमी होऊ लागलं. उपचारादरम्यान या आजाराने पीडित अनेक रूग्णांचा मृत्यू झाला. या स्थितीत रूग्णाला काहीच कळत नाही. पण त्यांचं फुप्फुस ७० टक्के बेकार झाल्यावर अचानक ऑक्सीजन सॅच्युरेशन खाली येतं. अशात तरूणांनी जास्त गंभीर होण्याची गरज आहे. कारण ते कोणत्याही लक्षणांना सिरीअर घेत नाहीत.
काय आहे हॅप्पी हायपोक्सिया?
हॅप्पी हायपेक्सिया कोरोनाचं नवं लक्षण आहे. डॉक्टरांनी सांगितलं की कोरोना रूग्णात सुरूवातीला कोणतंही लक्षण दिसत नाही. रूग्णाला तो बरा असल्यासारखंच वाटतं. पण अचानत ऑक्सीजन लेव्हल कमी होत असल्याने स्थिती गंभीर होते. आणि रूग्णाला थेट आयसीयूमध्ये दाखल करावं लागतं. समस्या अधिक वाढल्याने मृत्यूचा धोकाही वाढतो. हायपेक्सिया किडनी, मेंदू, हृदय आणि इतर प्रमुख अवयवांना प्रभावित करतं. (हे पण वाचा : कोरोनावर 'योग - प्राणायामा'ची मात्रा गुणकारी, शरीरातील ऑक्सिजन प्रमाण वाढून फुप्फुस ठेवा निराेगी)
बचावासाठी उपाय
संक्रमित व्यक्तीची सतत मॉनिटरिंग गरजेची
पल्स ऑक्सीमीटरने ऑक्सीजन लेव्हल चेक करत रहा
वेळेवर डॉक्टरने दिलेली औषधे घ्या
ऑक्सीजन लेव्हल ९४ टक्क्यांपेक्षा खाली आलं तर तात्काळ डॉक्टरकडे जा
शरीरात काही बदल झाला असेल तर दुर्लक्ष करू नका
हायपोक्सियाची लक्षणे?
हॅप्पी हायपोक्सियाची लक्षणे ६ ते ९ दिवसादरम्यान दिसतात. ओठांचा रंग बदलतो, त्वचा लाल, जांभळी दिसू लागते. विना कारण सतत घाम येतो आणि ऑक्सीमीटरमध्ये लेव्हल कमी दिसते.
अशात गरजेचं आहे की, प्रत्येक संक्रमित व्यक्तीने गाइडलाईन पालन करावं. कोरोनात दररोज नवीन लक्षणे दिसत आहेत. नवीन लक्षणे माहीत असणे गरजेचं आहे. सतत डॉक्टरच्या संपर्कात रहावं.