टोकियो: भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा गेल्या काही दिवसांपासून कमी होत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला देशात दररोज ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत होते. आता हा आकडा अडीच लाखांच्या खाली आला आहे. दररोज तीन लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त होत आहेत. त्यातच आता कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांबद्दल आणखी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनापासून कसं रोखायचं? मुख्यमंत्री ठाकरेंनी दिला कानमंत्रकोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. कोरोनावर मात केलेल्या ९६ टक्के रुग्णांच्या शरीरात एका वर्षानंतरही अँटिबॉडीज कायम असतात, अशी माहिती जपानच्या योकोहामा सिटी विद्यापीठानं केलेल्या संशोधनातून समोर आली आहे. जपानमधील क्योदो वृत्तसंस्थेनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. कोरोनाची लागण झालेल्या जवळपास २५० व्यक्तींच्या शारिरीक स्थितीची चाचणी संशोधनादरम्यान करण्यात आली.कोरोनापेक्षा लसीचे भय! लसीकरणासाठी आलेल्या पथकाला पाहून ग्रामस्थ घाबरले, नदीत उड्या मारून पळालेसंशोधनात सहभागी झालेल्या २५० जणांमध्ये २१ ते ७८ वर्षे वयाच्या व्यक्तींचा समावेश होता. गेल्या फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान या व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची जास्त लक्षणं आढळून आलेल्या व्यक्तींच्या शरीरात एक वर्ष अँटिबॉडी कायम होत्या. तर कोरोनाची कमी आणि अजिबात लक्षणं नसलेल्या ९७ टक्के व्यक्तींच्या शरीरात सहा महिन्यांपर्यंत अँटिबॉडी कायम राहिल्याचं संशोधनातून समोर आलं.कोरोना महामारी आल्यानंतर पहिल्याच महिन्यात संक्रमित झालेल्या व्यक्तींनी लस टोचून घेणं अतिशय गरजेचं असल्याचं संशोधन सांगतं. कोरोनाची सौम्य किंवा अजिबात लक्षणं नसलेल्या व्यक्तींनी प्राधान्यानं लसीकरण करून घ्यायला हवं. या व्यक्तींनी लस न घेतल्यास त्यांनी ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमधील व्हेरिएंटचा धोका असल्याची माहिती संशोधनातून पुढे आली आहे.
CoronaVirus News: कोरोनामुक्त झाल्यावर किती काळ राहतात अँटिबॉडी?; संशोधनातून समोर आली महत्त्वाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 2:36 PM