संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसची लस तयार होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. भारतातील सुद्धा अनेक शास्त्रज्ञ लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना व्हायरसवर उपचार म्हणून होमियोपेथिक औषधांवर प्रयोग सुरू करण्यात आले आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती चांगली असणं गरजेचं आहे. तसंच होमिओपेथिक गोळ्यांच्या सेवनाने रोगप्रतिकारकशक्ती वाढत असल्याचा दावा अनेक शास्त्रज्ञांनी केला आहे.
डॉ जवाहर शाह मागील ४० वर्षांपासून मुंबईत होमिओपेथीची औषधांच्या उपचारांबात सराव करत आहेत. डॉ शाह यांनी जगभरातील १०० होमिओपेथी डॉक्टरांसोबत मिळून एक खास औषधांचा संच तयार केला आहे. (CK1 आणि CK2) ही औषधं रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे कोणत्याही आजारापासून लांब राहणं सोपं होतं.
या औषधाच्या किटचे २ हजारापेक्षा जास्त पोलिसांमध्ये वाटप करण्यात आली आहेत. आयुष मंत्रालयाने दिलेल्या सुचनांनुसार ही औषधं विकसीत करण्यात आली आहेत. या औषधांमुळे psycho neuro endocrine वर परिणाम होतो. आयुष मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आर्सेनिक आणि कॅमफोरा M1 या औषधांचा उपचारांमध्ये समावेश केला आहे. अनेक देशात या औषधांची मागणी वाढली आहे.
महिन्यातून फक्त एकदाच या औषधांचे सेवन करायचे आहे. हा सहा दिवसांचा कोर्स असणार आहे. सुरुवातीला CK1 दिवसातून तीनवेळा आणि तीन दिवस घ्यायची आहे. त्याचप्रमाणे नंतर CK2 तीनवेळा तीन दिवस घ्यायची आहे. अशा पद्धतीने हा ६ दिवसाचा कोर्स पूर्ण होतो.
डॉक्टर शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसची लक्षणं न दिसत असलेल्या रुग्णांमध्ये या औषधांनी सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. याशिवाय या औषधांचा खर्च १५ ते २० रुपयांपेक्षा कमी असल्याचेही त्यांनी सांगितले.रणरणत्या उन्हाळात व्हायचं नसेल आजारांचं शिकार; तर 'असा' करा आरोग्याचा सांभाळ
ब्रायोनिया एल्वा-२०० या औषधाने ७ दिवसात कोरोनाचे रुग्ण होणार ठणठणीत बरे; पहिली चाचणी यशस्वी