गेल्या काही दिवसांपासून भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशभरात आता दिवसाला सरासरी ९० हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. देशातील सगळ्यात मोठं अखिल भारतीय वैद्यकिय संस्थान (AIIMS) च्या डॉक्टरांनी कोरोना व्हायरसबाबत मोठा खुलासा केला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार झाडूच्या वापरामुळेही कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. त्यासाठी येत्या २ ऑक्टोबरला स्वच्छता दिनाच्या प्रसंगी झाडूऐवजी वॅक्युम क्लीनरचा वापर केला जाणार आहे. एम्सच्या डॉक्टरांनी देशभरातील नेतेमंडळींना आवाहन केलं आहे की, माहामारीच्या काळात लोकांना झाडूऐवजी वॅक्युम क्लिनरचा वापर करून स्वच्छता अभियानात सहभागी व्हावं.
दिल्लीच्या एम्समधील सर्जरी तज्ज्ञ डॉ. अनुराग श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार,'' ज्या वेगाने देशात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. अशा स्थितीत लहानात लहान चुकही संपूर्ण देशाला माहागात पडू शकते. सार्वजनिक ठिकाणी झाडूचा वापर केल्यास मोकळ्या परिसरात मोठ्या प्रमाणात संक्रमण पसरण्याचा धोका असतो. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार एखाद्या मोकळ्या भागावर चार ते पाच दिवसांपर्यंत कोरोना व्हायरस जीवंत राहू शकतो. झाडू मारताना धुळ माती यांसह व्हायरस हवेत पसरू शकतो. त्यामुळे श्वासांमार्फत किंवा अन्य मार्गांनी शरीरात व्हायरसचा प्रवेश होऊ शकतो.''
यावेळी त्यांनी असेही सांगितले की, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्किल इंडीया मोहिमेला प्रोत्साहन देत देशात तयार करण्यात आलेल्या वॅक्युम क्लिनरचा वापर वाढवायला हवा. जेणेकरून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. स्वच्छता दिनाच्या प्रसंगी झाडूऐवजी वॅक्युम क्लीनरचा वापर केला जायला हवा. कारण पावसाळ्याच्या वातावरणात इतरत्र झाडू किंवा कचरा पडून राहिल्यानं रस्त्यावर मोठ्या परिसरात संक्रमण पसरण्याचा धोका वाढू शकतो.''
भारतात का वेगाने वाढताहेत कोरोनाचे रुग्ण?, समोर आलं मोठं कारण
भारतात कोरोनाच्या संसर्गाच्या वाढलेल्या वेगामागचे महत्त्वाचे कारण समोर आले आहे. देशातील कोरोनाच्या वाढत्या वेगामागे कोरोना विषाणूचे सर्वात संसर्गजन्य प्रतिरूप A2a आहे. कोरोनाच्या या प्रतिरूपाने अवघ्या काही दिवसांतच देशातील ७० टक्के रुग्णांना आपल्या विळख्यात घेतले आहे.
आता A3i हे कोरोनाचे प्रतिरूप भारतातून हळूहळू नष्ट झाल्याच आश्चर्य वाटायला नको, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. मात्र आता A3i या प्रतिरूपाचे स्थान A2a या प्रतिरूपाने घेतले आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे कोरोनाचे हे प्रतिरूप अधिक वेगाने फैलावते. आता कोरोनाचे A2a हे रूप देशात मोठ्या प्रमाणात पसरले आहे.
सीसीएमबीचे संचालक डॉ. राकेश कुमार यांच्या म्हणण्यानुसार वाटत असलेल्या भीतीप्रमाणे कोरोनाच्या A2a या रूपाने इतर जगाप्रमाणे भारतातही आपले हातपाय पसरले आहेत. मात्र संपूर्ण जगात पसरलेल्या विषाणूमधील एकाच प्रकारच्या जीनोममुळे एकाच प्राकरची लस आणि औषध या म्युटेशनविरोधात परिणामकारक ठरेल. मात्रा कोरोनाचे A2a हे प्रतिरूप A3i या प्रतिरूपापेक्षा अधिक धोकादायक आहे किंवा नाही याबाबत अभ्सासातून स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र A2a या प्रतिरूपाच्या संसर्गाचा वेग हा खूप अधिक असल्याचे समोर आले आहे. आता जोपर्यंत प्रभावी लस विकसित होत नाही तोपर्यंत कोरोनाच्या A2a या प्रतिरूपापासून वाचणे हाच एकमेव उपाय असेल.
हे पण वाचा-
डायबिटीस टाईप २ चं टाईप १ मध्ये रुपांतर होऊ शकतं? समजून घ्या हा आजार
घसा कोरडा झाल्यास कोरोना संसर्गाचा धोका वाढतो? जाणून घ्या 'या' व्हायरल मेसेज मागचं सत्य
पोटाच्या रोजच्या तक्रारी ठरू शकतात IBD समस्येचं कारण; वाचा लक्षणं आणि उपाय
भय इथले संपत नाही! चीनमध्ये नव्या माहामारीचा शिरकाव; आत्तापर्यंत हजारो लोकांना संसर्ग
तुम्हालाही अचानक BP चा त्रास होतो? तज्ज्ञांनी सांगितले 'बीपी' नियंत्रणात ठेवण्याचे सोपे उपाय