कोरोना व्हायरसच्या माहामारीने संपूर्ण देशात हाहाकार पसरवला आहे. कोरोनाच्या प्रसाराबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. कोरोना व्हायरसबाबत जनजागृती करण्यासाठी विविध स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. मास्क, सोशल डिस्टेंसिगचं पालन करताना लोक दिसून येत आहेत. तर काही ठिकाणी अजूनही लोकांना सोशल डिस्टेंसिंगचं पाळलं जात नाही. सध्याच्या काळात कोरोना व्हायरसबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे कोरोना व्हायरसचा प्रसार कानांमार्फतही होतो. आज आम्ही तुम्हाला याबाबात तज्ज्ञाचं काय मत आहे. याबाबात माहिती देणार आहोत.
आरोग्य तंज्ञांनी दिलेल्या माहितीनसार कोरोना व्हायरस व्यक्तीच्या नाकातून कानातून किंवा डोळ्यामार्फत शरीरात प्रवेश करू शकतो.जर तुम्हाला कानांशी निगडीत कोणताही आजार नसेल तर कोरोना व्हायरस कानांमार्फत प्रवेश करू शकत नाही. कोरोना व्हायरसच्या क्षमतेत बदल झालेला अनेकांना दिसून आला आहे. परंतू अद्याप याचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. देशात कोरोनाचं संक्रमण वेगाने पसरत असताना ८० टक्के लोकांना उपचारांची आवश्यकता भासत आहे. तर काही टक्के लोक रोगप्रतिकारकशक्ती बळकट असल्यामुळे उपचार न घेता स्वतःच बरे झाले आहेत.
कोरोना व्हायरसबाबात नकरात्मक विचार ठेवू नका
कोविड19 एचआयव्ही सारखा आजार नाही. जो एकदा उद्भवल्यास परत कधीही बरा होऊ शकत नाही. भारतातील मृत्यूदर कमी आहे. सर्वाधिक रुग्ण हे १० ते १४ दिवसात बरे होत आहेत. त्यामुळे कोरोना व्हायरसला घाबरून नकारात्मक विचार ठेवू नका. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता सर्वच देशातील शास्त्रज्ञ लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेक कंपन्याचे लसीचे परिक्षण अंतीम ट्प्प्यात आहे.
या वर्षाच्या शेवटापर्यंत लस तयार होऊ शकते. अशी आशा तज्ज्ञांना आहे. कोरोना व्हायरस व्यक्तीच्या खोकण्यातून शिंकण्यातूनन पसरत असल्यामुळे सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. संक्रमणाला रोखण्यासाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी मास्कचा वापर करणं गरजेचं आहे.
गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल १४ हजार ८२१ नवे रुग्ण सापडले असून, या २४ तासांत ४४५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये तब्बल १४ हजार ८२१ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा चार लाख २५ हजार २८२ वर पोहोचला आहे. तर दिवसभरात ४४५ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागल्याने देशात कोरोमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या १३ हजार ६९९ वर पोहोचली आहे. आतापर्यंत दोन लाख ३७ हजार १९६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
'या' सोप्या आयडिया वापराल; तर पावसाळ्यात कपडे वाळवण्याचं टेन्शन झटपट होईल दूर
भारतात तयार होत आहे कोविड19 चे औषध; जाणून घ्या डोस, किंमत याबाबत ८ महत्वाच्या गोष्टी