दर वर्षी २५ मे ला जागतीक थायरॉईड दिन साजरा केला जातो. थायरॉईड हा गंभीर स्वरुपाचा आजार आहे. या आजाराला सायलेंट किलर असं सुद्धा म्हणतात. यामुळे थायरॉईड या आजाराबाबत जागरूकता पसरवणं गरजेचं आहे. कोरोनामुळे जगभरात हाहाकार निर्माण झाला आहे. कोरोना विषाणूंचे संक्रमण होऊन मृत्यू होत असलेल्यांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाच्या उपचारांसाठी आत्तापर्यंत कोणतीही लस शोधण्यात आलेली नाही. शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत.
अलिकडे करण्यात आलेल्या संशोधनातून एक धक्कादायक खुलासा झाला आहे. कोरोना व्हायरसच्या संपर्कात येत असलेल्या लोकांना थायरॉईड म्हणजेच शरीरातील अवयव सुजण्याची समस्या भेडसावू शकते. या संशोधनात काय दिसून आलं याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
तज्ज्ञांच्यामते कोरोना विषाणूंचे संक्रमण झालेल्या लोकांना श्वासासंबंधी आजार उद्भवतात. व्हायरल इन्फेक्शन किंवा पोस्ट व्हायरल इन्फ्लेमेटरी रिएक्शनचं होऊ शकते. इटली युनिव्हरसिटी हॉस्पीटल ऑफ पीसामधील तज्ज्ञ फ्रान्सिस्को लॅट्रॉफ यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसच्या संक्रमणानंतर सबस्यूट थायरॉईडीटीस ची समस्या उद्भवण्याचे संकेत आम्ही दिले असून डॉक्टरांनी याबाबतीत सर्तक राहणं गरजेचं आहे.
जर्नल ऑफ क्लिकोलॉजी एंड मेटाबोलिजम यात प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार सबस्यूट थायरॉईडीटीसमुळे रुग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. यामुळे घशातील ग्रंथींना सूज येते. त्यामुळे घसा दुखण्याची समस्या उद्भवते. साधारणपणे या समस्येमुळे श्वसन तंत्राच्या वरच्या भागात इन्फेक्शन होऊ शकतं.
याशिवाय कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कोरोना व्हायरसमुळे हृदयाशी संबंधीत आजार होतात. सध्या कोरोना रुग्णांच्या शरीरात रक्त गुठळ्या तयार होण्याची, रक्त गोठण्याची लक्षणं दिसून येत आहेत. तसंच कोरोनातून बरे झाल्यानंतर रुग्णाला मानसिक आजारांचा सुद्धा सामना करावा लागू शकतो. त्यात पोस्ट ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसॉर्डर आणि डेलिरियमसारख्या मानसिक आजारांचा समावेश आहे.
कोरोनासोबत जगताना विषाणूंच्या संक्रमणाला लांब ठेवण्यासाठी; 'अशी' घ्या काळजी
CoronaVirus News : एकदा कोरोना झाल्यावर परत संपर्क आल्यास कोरोना होऊ शकतो का?