भारतात आता दिवसेंदिवस कोरोना व्हायरसच्या संक्रमणाच्या केसेस वाढत आहेत. रविवारी देशात कोरोना व्हायरसचे ४६,९६४ नवीन रुग्ण समोर आले आहेत. दरम्यान एक दिलासादायक बाब समोर येत आहे. भारतात कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची सुरूवात झाल्यापासून आतापर्यंत पहिल्यांदाच संपूर्ण महिनाभर रुग्णांच्या संख्येत घट समोर आली आहे. आकड्यांनुसार ऑक्टोबरमध्ये भारतात कोरोनाच्या रुग्णांमध्ये ३० टक्क्यांनी कमतरता दिसून आली आहे.
आकड्यांवरून दिसून येईल की, कोरोना रुग्णांमध्ये सप्टेंबर महिन्यापासून घट दिसून येत होती. याचा परिणाम ऑक्टोबरच्या आकड्यांवरही झाला. संपूर्ण ऑक्टोबरमध्ये भारतात कोरोना व्हायरसच्या संक्रमणात घट झालेली दिसून आली आहे. ऑक्टोबरमध्ये भारतात कोरोना व्हायरसच्या संक्रमणात १८.३ लाख केसेस समोर आल्या होत्या. सप्टेंबरमध्ये ही संख्या २६.२ लाख इतकी होती. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये रुग्णसंख्या कमी दिसून आली. ऑगस्टमध्ये देशात १९.९ लाख रुग्णांची नोंद करण्यात आली होती.
कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे होत असलेल्या मृतांच्या आकडेवारीवर लक्ष दिल्यास दिसून येईल की, ऑक्टोबरमध्ये जवळपास २३,५०० लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला होता. ही संख्या सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत २९ टक्के कमी होती. सप्टेंबरमध्ये देशात ३३,२५५ लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला होता. भारतात ऑगस्टमध्ये २८, ८५९ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. दिलासादायक! कोरोना रुग्णांवर प्रभावी ठरतेय 'ही' नवी थेरेपी, असा होणार बचाव
दरम्यान रविवारी कोरोना व्हायरसचे ४६,९६४ रुग्ण समोर आले असून आता एकूण रुग्णसंख्या ही वाढून ८१, ८५,०८३ इतकी झाली आहे. देशात मागच्या २४ तासात ४७ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा वाढून १,२२, १११ वर पोहोचला आहे. भारतात आतापर्यंत ७४,९१,५१३ रुग्ण कोरोना संक्रमणातून बरे झाले आहेत. आतापर्यंत ५, ७०, ४५८ लोकांना कोरोना संक्रमणाचा सामना करावा लागला आहे. भय इथले संपत नाही! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर; 'या' देशात पुन्हा महिनाभराचा लॉकडाऊन घोषित