आयुर्वेदिक औषध असो किंवा कोणतेही एलोपेथी उपचार. काही अटी घातल्याशिवाय कोरोना रुग्णांचे उपचार या औषधांनी करण्यात येत नाहीत. बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या औषधाबाबत नवीनच दावा केला जात आहे. यामुळे कोरोना रुग्णांचे उपचार केले जाऊ शकतात. पण काही अटी घालण्यात आल्या आहेत.आयुर्वेदात रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारी तत्व असतात याबाबत सगळ्यांनाच कल्पना आहे.
अनेक रुग्ण औषधोपचार न घेता घरीच बरे होत आहेत. भारतात गंभीर स्थितीत कोरोना रुग्णांना वाचवण्याचं मोठं आवाहन आहे. गंभीर स्थितीतील रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी औषध मिळणं गरजेचं आहे. सध्या नवीन औषधाचे नाव समोर आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अजुनही गेमचेंजर औषध समोर आलेलं नाही.
कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी फेविपिरावीर या औषधाच्या वापरासाठी परवागनी मिळाली आहे. काही ठिकाणी लोकांनी मेडिकल्समध्ये जाऊन औषधं मागायला सुरूवात केली आहे. भारतासह जगभरातील देश कोरोनाच्या उपचारांवर औषध मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या जीवघेण्या व्हायरसवर मात करण्यासाठी चमत्कारिक औषधाच्या शोधात शास्त्रज्ञ आहेत.
जगभरातील विविध देशात कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी जी औषधं वापरली जात आहेत. ती औषध भारताच्या बाजारात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. फेविपिराविर हे औषध व्हायरल इंफेक्शनच्या उपचारांसाठी जपानमध्ये २०१४ साली वापरण्यात आलं होतं. आता भारतातील ग्लेनमार्कला हे औषध तयार करण्यासाठी तसंच विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे.
कंपनीने केलेल्या दाव्यानुसार ४ दिवसात व्हायरसचा प्रभाव कमी करण्यासाठी हे औषध परिणामकारक ठरू शकतं. भारतातील रुग्णांलयांमध्ये हे औषध पुरवलं जात आहे. भारतात फेविपिराविर हे औषध फेबीफ्लू नावाने विक्रीस उतरवले जात आहे. या औषधाच्या एका गोळीची किंमत १०३ रुपये आहे.
अलिकडे अमेरिकेतील कंपनीचे औषध रेमडिसीविरसुद्धा कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी वापरले जात आहे. भारतात आता सिप्ला आणि हेट्रो या कंपन्यांना औषध तयार करण्याची परवागनी देण्यात आली आहे. हे औषध इंजेक्शनच्या माध्यमातून रुग्णांना देण्यात येतं. २०१४ मध्ये इबोला व्हायरसच्या उपचारांसाठी या औषधाचा वापर करण्यात आला होता.
तज्ज्ञांच्यामते सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या औषधांमध्ये कोणतेही वंडर ड्रग नाही. म्हणजेच कोणत्याही औषधाचे चमत्कारीक परिणाम दिसून आलेले नाहीत. जोपर्यंत कोरोनाची लस येत नाही. तोपर्यंत औषधांच्या साहाय्याने कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु या औषधांचा बाजार तयार होऊ नये असं तज्ज्ञांचं मत आहे.
'या' ४ स्थितीत फुफ्फुसांचं होतं मोठं नुकसान; जाणून घ्या कोरोनाकाळात निरोगी राहण्याचे उपाय
कोरोनातून बऱ्या झालेल्या पुरुषांच्या शरीरात महिलांपेक्षा जास्त असतो 'हा' घटक