कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या १० लाखांवर पोहोचली आहे. अमेरिका, ब्राझिल, भारत आणि रशिया या देशात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहे. या माहामारीतून बाहेर येण्यासाठी जगभरातील प्रत्येक नागरीकाला लस कधी येणार याची प्रतिक्षा आहे. कोरोना व्हायरसच्या लसीचे मानवी परिक्षण अमेरिका, रशिया आणि भारतात सुरू आहे. भारतातील भारत बायोटेक आणि आयसीएमआरने विकसित केलेल्या कोवॅक्सिनबाबात महत्वाची माहिती समोर येत आहे.
भारतात कोवॅक्सिन या लसीच्या मानवी चाचणीस सुरूवात झाली आहे. या मानवी परिक्षणाचे लोकांवर कसे परिणाम दिसून आले याबात माहिती दिली जात आहे. मानवी चाचणीत या लसीचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. हरियाणाच्या पीजीआय रोहतक या वैद्यकीय संस्थेमध्ये व्यक्तींना ही लस देण्यात आली. या व्यक्तींवर ही लस घेतल्याने कोणताही दुष्परिणाम झालेला नाही. हैदराबादमधील भारत बायोटेक (Bharat Biotech) कंपनीने ही लस तयार केली आहे. इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्च (ICMR) आणि पुण्यातील नेशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीसह मिळून ही लस तयार करण्यात आली आहे.
या लसीला BBV152 COVID vaccine हे नाव देण्यात आलं आहे. या स्वदेशी लसीचे प्राण्यांवरील परिक्षण सफल झाल्यानंतर मानवी चाचणीसाठी CDSCO कडून परवागनी मिळाली. विविध राज्यांमधल्या १२ हॉस्पिटल्समध्ये या लशीची चाचणी केली जाते आहे. त्यामध्ये पीजीआय रोहतक वैद्यकीय संस्थेचाही समावेश आहे. या ठिकाणी तीन जणांना ही लस देण्यात आली होती.
हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोवॅक्सिनची मानवी चाचणी सुरू झाली असून ३ जणांना आज ही लस देण्यात आली. त्या लसीचा कोणताही दुष्परिणाम दिसून आला नाही. आता निरोगी लोकांना लस दिल्यानंतर काय परिणाम दिसून येतात. याचे निरिक्षण केले जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी ३ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. असे त्यांनी सांगितले आहे. या मानवी चाचणीचे अहवाल ICMRला पाठविले जाणार आहेत. मोठ्या स्तरावरील चाचणीसाठी २०० स्वयंसेवकांना निवडले जाणार आहे.
त्वचेवरचे 'ते' डाग असू शकतात कोविड 19 चे लक्षणं; कोरोना संसर्ग झाल्यास जाणवतो असा त्रास
कोरोना विषाणूंचा रहस्यमय हल्ला; वेगवेगळं राहत असूनही ३५ दिवसात ५७ लोकांना कोरोनाची लागण