मुंबई: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात देशात पहिल्यांदाच एका दिवसात कोरोनाचे एक लाख रुग्ण आढळून आले. यानंतर अवघ्या तीन आठवड्यांत हा आकडा तब्बल साडे तीन लाखांच्या जवळ पोहोचला आहे. अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नसल्याचं चित्र आहे. आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे. ऑक्सिजन, रेमडेसिविरचा तुटवडा भासू लागला आहे. रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिविरसाठी धावाधाव करत आहेत. मात्र अहमदनगरमधील डॉ. रवी आरोळे रेमडेसिविरशिवाय कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. त्यांनी जवळपास ५ हजार रुग्णांना रेमडेसिविरचा वापर न करता कोरोनामुक्त केलं आहे.ना रेमडेसिविर, ना महागडी औषधे; तरीही रुग्ण होताहेत ठणठणीत बरे!सध्या रेमडेसिविरची प्रचंड चर्चा सुरू आहे. मागणी वाढल्यानं तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे काळाबाजार होऊ लागला आहे. रेमडेसिविरशिवाय उपचार शक्य नसल्याचं म्हणत काही रुग्णालयं रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिविर आणण्यास सांगत आहेत. तर काही ठिकाणी रुग्णाचे नातेवाईकच रेमडेसिविरचा आग्रह धरत आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. रवी आरोळेंशी लोकमतनं संवाद साधला. त्यात त्यांनी रेमडेसिविरशिवाय कोरोना रुग्णांना कसं बरं करता येतं, याबद्दलची उपचारपद्धतच सांगितली.
CoronaVirus News: रेमडेसिविरशिवाय ५००० जणांना कोरोनामुक्त करणारे डॉक्टर; जाणून घ्या उपचार पद्धत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 11:07 AM