हैदराबादः कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगभरात कहर केला आहे. कोरोना विषाणूंशी लढण्यासाठी जगभरातील देश प्रयत्न करत आहेत. वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता जास्तीत जास्त लोकांना कोरोनापासून वाचवता यावं यासाठी नवनवीन औषधांवर प्रयत्न सुरू आहे. तसंच अनेक कोरोनाच्या लसी शेवटच्या टप्प्यात असल्याचं दिसून येतं. दरम्यान कोरोनाच्या औषधांबाबत सकारात्मक माहिती समोर येत आहे.
कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरत असलेल्या फेव्हिपिराव्हिर (Favipiravir ) औषधाचे उत्पादन आता भारतातही सुरू झाले आहे. देशात अनेक कंपन्यांनी या औषधांच्या उत्पादनाची घोषणा केल्यानंतर आता देशातील सर्वात मोठी फार्मा कंपनी डॉ रेड्डीज यांनीही याचे जेनेरिक व्हर्जन लाँच केले आहे. फेव्हिपिराव्हिरचे जेनेरिक व्हर्जन Avigan भारतात लाँच करण्यात आले आहे. एव्हिगन कंपनीकडून १२२ गोळ्यांच्या थेरेपीचं हे पाकिट असणार आहे. २ वर्षांपर्यंत हे औषध टिकू शकेल.
या कंपनीने Favipiravir च्या उत्पादनासाठी FUJIFILM Toyama Chemical सोबत करार केला आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी हे औषध याआधी भारतात MSN ग्रुप, सिप्ला, हेटेरो, ग्लेनमार्क, सन फार्मा, जेनवर्क्ट फार्मा यांनीही जेनेरिक औषध लाँच केले आहे. भारतात फेव्हिपिराव्हिर हे औषध ३३ रुपयांपासून ७५ रुपये प्रति टॅबलेट किमतीला मिळत आहे. गेल्या आठवड्यात MSN ग्रुपने 'फेव्हिलो' नावाने या औषधाचे सर्वात स्वस्त व्हर्जन लाँच केले होते. सन फार्मा कंपनीने अशी घोषणा केली होती, की भारतात हे औषध ३५ रुपये प्रति टॅबलेटच्या किंमतीने मिळेल. या औषधाची डिलिव्हरी देशातील वेगवेगळ्या ४२ शहरांमध्ये होणार आहे.
दरम्यान कोरोनाच्या उपचारांबाबत एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. वॅकिओलिन (vacuolin), आणि एपिलिमोड( apilimod) ही औषध कोविड १९ पसरवत असलेल्या कोरोना व्हायरसला शरीरात प्रवेश करण्यापासून रोखतात. शरीरात प्रवेश केल्यानंतरही व्हायरसचा विस्तार होण्यापासून रोखण्यासाठी ही औषधं परिणामकारक ठरतात. हा अभ्यास जर्नल पीएनएएसमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. एका वर्षांपूर्वी या दोन औषधांना विकसित करण्यात आलं होतं.
आऊटलुक इंडीयाच्या रिपोर्टनुसार या औषधाने कोरोनाच्या प्रसारास कारणीभूत ठरत असलेल्या एजाइम्सवर (पिकफाईव्ह कायनेज) नियंत्रण मिळवता येतं. हार्वर्ड मेडिकल स्कूलचे प्राध्यापक आणि वरिष्ठ साहाय्यक लेखक थॉमस किरछाऊसेन यांनी दिलेल्या माहितीनुसार या अभ्यासातून दिसून आले की कोरोना विषाणूंशी लढण्यासाठी हे औषध परिणामकारक ठरत आहे.
हे पण वाचा
खुशखबर! भारतात सर्वाधिक लोकांच्या शरीरात कोरोनाशी लढण्यासाठी एंटीबॉडी तयार
कोरोनाचं ३ तिसरं लक्षणं आहे अंगदुखी आणि मासपेशींतील वेदना; 'या' उपायांनी मिळवा आराम
पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे पसरताहेत जीवघेणे आजार; संसर्ग होण्याआधी स्वतःला 'असं' ठेवा सुरक्षित