शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

चिंताजनक! दातांच्या डॉक्टरांना कोरोनाचा धोका जास्त; WHO नं दिल्या 'ओरल चेकअप' च्या गाईडलाईन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 1:43 PM

CoronaVirus News & Latest Updates : WHO नं माहामारीच्या काळात दातांच्या डॉक्टरांना धोका सगळ्यात जास्त असल्याचे सांगितले असून  गाईडलाईन्स दिल्या आहेत. 

संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने हाहाकार पसरवला आहे. संक्रमित रुग्णांचे उपचार करत असलेल्या अनेक आरोग्यक्षेत्रातील कर्मचारी, डॉक्टर्स यांना कोरोनाची लागण झाली आहे. अनेक कोरोनायोद्ध्यांना या माहामारीत आपला जीव गमवावा लागला आहे. अशा स्थितीत जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी दातांच्या डॉक्टरर्सना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं वाढत्या संक्रमणात डॉक्टरांकडून रुटीन चेकअप करताना स्वतःचा बचाव करण्याचा सल्ला दिला आहे. WHO नं माहामारीच्या काळात दातांच्या डॉक्टरांना धोका सगळ्यात जास्त असल्याचे सांगितले असून  गाईडलाईन्स दिल्या आहेत. 

या  गाईडलाईन्समध्ये रुग्णाचे रुटीन चेकअप करताना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.  तसंच जोपर्यंत कोरोनाचा प्रभाव कमी होत नाही तोपर्यंत रुग्णांची ओरल ट्रीटमेंट न करण्याचंही आवाहन केलं आहे.  इतकंच नाही तर जर आपातकालीन स्थिती उद्भवत असेल तर रुग्णांना व्हिडीओ कॉन्फरेंसिंगद्वारे रुग्णांना सल्ला देण्याचं सांगितले  आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार डॉक्टरर्स सध्या संक्रमणाच्या हाय रिस्क जोनमध्ये आहे. अशा स्थितीत दातांसंबंधी समस्यांचा उपचार करत असताना लाळेत असलेल्या व्हायरसमुळे संक्रमण पसरण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कोणत्याही मार्गातून व्हायरसची लागण होऊ शकते. 

डेंटल क्लीनिकमध्ये डॉक्टर एयरोसोल जनरेटिंग प्रक्रियेचा वापर करतात. याद्वारे संक्रमण पसरण्याचा धोका वाढतो. गाईडलाईन्सनुसार तोंडातील संक्रमण, रक्तस्त्राव, सूज येणं अशा समस्या औषधं, गोळ्यांनी नियंत्रणात येत नसतील तरच दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला आहे. सामान्य समस्यांसाठी दवाखान्यात शक्यतो  जाऊ  नये असं WHO  च्या तज्ज्ञांनी सांगितले आहे.

दरम्यान कोरोनावर शोधून काढण्यात येणारी लस शंभर टक्के प्रभावी असण्याची शक्यता खूप कमी आहे. मात्र, ही लस ५० टक्के जरी प्रभावी असेल, तर एक वर्षाच्या आत जनजीवन पूर्वीप्रमाणे सुरळीत होईल, असे संसर्गजन्य रोगांचे अमेरिकेतील आघाडीचे तज्ज्ञ डॉ. अँथनी फौसी यांनी म्हटले आहे. कोरोना साथीसंदर्भात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार म्हणूनही फौसी सध्या काम पाहत आहेत. त्यांनी सांगितले की, पुढच्या वर्षीपर्यंत कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

त्यानंतर या साथीला प्रभावी आळा घालता येईल. त्यामुळे २०२१ च्या अखेरीपर्यंत जगातील जनजीवन पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. कोरोनाची लस विकसित झाली तरी हा विषाणू पृथ्वीतलावरून नष्ट होणार नाही, याची प्रत्येकाने नोंद घेतली पाहिजे. जगातून फक्त देवीचे विषाणू नष्ट करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. कोरोनाच्या लसीमुळे या विषाणूचे उपद्रव्यमूल्य कमी करता येईल.

हे पण वाचा

..... तर २०२१ च्या शेवटापर्यंत कोरोनाची माहामारी पूर्ण नष्ट होणार; तज्ज्ञांचा दावा

युद्ध जिंकणार! शरीरात कोरोना विषाणूंची वाढ होण्यापासून रोखणार 'हे' नवीन औषध, तज्ज्ञांचा दावा

शेवटच्या टप्प्यात पोहोचली चीनी कंपनीची कोरोना लस; 'या' देशाला लसीचे डोस पुरवणार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना