भारतात कोरोना व्हायरसच्या लाटेला लोक जबाबदार आहेत. कोरोना इन्फेक्शनपासून बचावासाठी मागच्या वर्षापासून ज्या उपयायोजना राबवल्या जात होत्या. ज्यापद्धतीनं काळजी घेतली जात होती. त्यात निष्काळजीपणा होताना दिसून आला. इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च(ICMR) चे माजी संचालक डॉ. वी एम कटोच यांनी दैनिक भास्करशी बोलताना याबाबत खुलासा केला आहे. यावेळी त्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपेक्षा शिक्षित आणि मध्यमवर्गीय लोक वाढत्या उद्रेकाला जबाबदार असल्याचे सांगितले आहे.
१ मे पासून १८ वर्षांवरील सगळ्यांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोरोना व्हायरसचा प्रसार थांबेल का?
यावर त्यांनी सांगितले की, ''लस म्हणजे काही जादूची छडी नाही. लसीमुळे फक्त एक सुरक्षा कवच मिळते. त्यामुळे कोरोना संक्रमणाची तीव्रता कमी होते. हेल्थ केअर आणि फ्रंटलाईन कामगार नेहमीच सामान्यांच्या संपर्कात राहतात. म्हणूनच सरकारनं त्यांना सगळ्यात आधी लस त्यांना लस दिली. कोरोनाची लस घेतल्यानंतर लोकांनी नियमांचे पालन केले तर कोरोनापासून बचाव होऊ शकतो.''
कोरोना संक्रमणाचा धोका ३१ टक्क्यांनी कमी करणार हा सोपा उपाय; संशोधनातून खुलासा
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे दुसरी लाट अधिक तीव्र झाली?
डॉ. कटोच म्हणाले की, ''लोक आपल्या निष्काळजीपणाचे खापर इतरांच्या डोक्यावर फोडत आहेत. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची संक्रामता जास्त आहे. पण कोरोनाशी निगडीत इतर गोष्टींशी सावधगिरी बाळगल्यास संक्रमणाचा धोक कमी होतो. मागच्या वर्षी ज्या उपायांचे पालन केले जात होते. त्याचप्रकारे आताही सातत्यानं नियम पाळायला हवेत.''
दुसऱ्या लाटेच्या संक्रमणाची तीव्रता कधी कमी होणार?
या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, ''जर आज कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी लोकांनी आवश्यक उपाययोजना केल्या तर 20-25 दिवसात नवीन संक्रमितांची संख्या कमी होईल. परंतु त्यासाठी कोरोनाशी संबंधित उपायांचे आपण काटेकोरपणे पालन केले पाहिजे. गेल्या वर्षी सरकारने निर्बंध लादले होते.
यामागील एकमेव कारण म्हणजे लोकांचा संपर्क कमी असावा जेणेकरून व्हायरस जास्त पसरू नये. गेल्या वर्षीही लाट सुशिक्षित मध्यमवर्गामुळे पसरली होती. परदेशातून आलेल्या लोकांनी निष्काळजीपणाने लोकांमध्ये संसर्ग पसरविला. तेव्हा आपण लस न देता देखील कोरोना संसर्गाला कमी केले होते.''