शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Weather Forecast: मुंबईत पुन्हा मुसळधार पाऊस बरसणार; असा आहे हवामान खात्याचा अंदाज
2
इंडोनेशियातील सोन्याच्या खाणीत भूस्खलन; १२ जणांचा मृत्यू, १८ बेपत्ता
3
Russia Ukraine War : भीषण! रशियाने युक्रेनवर डागले रॉकेट; ५० हून अधिक हवाई हल्ले, ११ जणांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
Hathras Stampede : "१०-१२ लोक विषारी स्प्रे घेऊन..."; भोले बाबांच्या वकिलाचा दावा, हाथरस चेंगराचेंगरीची नवी थिअरी
5
Assam Flood : पावसाचा हाहाकार! आसाममध्ये पूरस्थिती गंभीर; ७८ जणांचा मृत्यू, पूरग्रस्तांना भेटणार राहुल गांधी
6
साखर-मीठ किती आहे? कंपन्यांना पॅकेटवरच द्यावी लागणार माहिती, मोठ्या अक्षरात लिहिणं बंधनकारक
7
Rain Update : कालपासून राज्यात जोरदार पाऊस; महाराष्ट्रातील 'या' भागात ऑरेंज अलर्ट, पुढचे चार दिवस कोसळणार
8
Budget 2024 : स्टँडर्ड डिडक्शनची सूट मर्यादा वाढून १ लाख रुपये होणार का? २३ जुलैला मिळणार उत्तर
9
'मी त्याच्यासारखी नाही...', दुसऱ्या घटस्फोटातून सावरणं कठीण; दलजीत कौरने व्यक्त केल्या भावना
10
अदानींविरोधात आंतरराष्ट्रीय कट! हिंडेनबर्गनं दोन महिन्यांपूर्वीच क्लायंटशी शेअर केलेला रिपोर्ट, मोठा गौप्यस्फोट
11
Chennai Petroleum Corporation Ltd: १ शेअरवर ५५ रुपयांचा डिविडेंड देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट २० जुलैपूर्वी; जाणून घ्या
12
कुलगाममध्ये कपाटात बंकर बनवून लपले होते चार दहशतवादी; धक्कादायक व्हिडीओ समोर
13
अलिबागमध्ये मुसळधार पावसाने हाहा:कार; तालुक्यात अनेक भागात पूरस्थिती; नागरिकांच्या घरात शिरले पाणी
14
विकी कौशल-तृप्ती डिमरीच्या रोमँटिक केमिस्ट्रीवर चाहते फिदा, नेटकरी म्हणाले, 'कतरिनाचा...'
15
प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी: मुंबईतील मुसळधार पावसामुळे 'या' ५ एक्स्प्रेस ट्रेन रद्द 
16
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; TATA Motors मध्ये तेजी, टायटन कंपनीचे शेअर्स घसरले
17
पुण्यात मध्यरात्री कारच्या धडकेत पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू; तर एक जण गंभीर जखमी!
18
Income Tax Rule: तुमच्या मुलानं कमाई केली तर, कोण भरणार इन्कम टॅक्स? काय म्हणतो आयकर विभागाचा नियम, जाणून घ्या
19
खळबळजनक! शाळेतलं प्रेम, लव्ह मॅरेज... कपलने उचललं टोकाचं पाऊल; नेमकं काय घडलं?
20
मोठी बातमी: मुंबईला पावसाने झोडपलं; शाळा-कॉलेजबाबत BMCचा महत्त्वपूर्ण निर्णय

CoronaVirus News: लवकरच कोरोनाचा गेम ओव्हर? शास्त्रज्ञांनी शोधलं स्वस्त अन् मस्त 'गुप्त हत्यार' 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 4:08 PM

CoronaVirus News: कोरोनावर मात करण्यासाठी साधी सोपी अन् सुलभ उपचार पद्धती; महत्त्वाचं संशोधन

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा गेल्या काही दिवसांपासून कमी होऊ लागला आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असताना आता तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. तिसरी लाट थोपवण्यासाठी लसीकरणाला वेग देण्याचं काम सुरू आहे. याशिवाय लवकरच भारतात नेजल स्प्रे उपलब्ध होईल. यानंतर आता शास्त्रज्ञांनी आणखी एक उपचार पद्धत शोधून काढली आहे. कर्तव्यनिष्ठेला सलाम! रक्ताच्या आजाराने त्रस्त असूनही 'या' महिला डॉक्टर करताहेत रुग्णसेवाकोरोनाला हरवण्यासाठी शास्त्रज्ञांनी नवा उपाय शोधून काढला आहे. कोरोना रुग्णाच्या शरीरात अँटी-कोविड नॅनोबॉडीज सोडून त्या माध्यमातून कोरोनाचा खात्मा करण्याची पद्धत शास्त्रज्ञांनी शोधली आहे. विशेष म्हणजे यामध्ये रुग्णाला केवळ अँटीबॉडी नाकावाटे शोषून घ्याव्या लागतील. म्हणजेच श्वासावाटे नॅनोबॉडीज शरीरात जातील. सर्दी झाल्यावर आपण इलहेलर वापरतो. तीच पद्धत यामध्ये वापरण्यात आली आहे. ही उपचार पद्धत कोरोनाविरोधात गुप्त हत्यार म्हणून काम करेल, असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. यामुळे कोरोनाचे स्पाईक प्रोटिन नष्ट होतील. त्यामुळे कोरोना पसरण्याची प्रक्रिया निष्क्रिय होईल.Covaxin च्या ६ कोटी लसींचे उत्पादन; राज्याला केवळ २ कोटींचा पुरवठा, आकडेवारीत तफावत!युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्ग स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी नव्या उपचार पद्धतीचा शोध लावला आहे. संशोधकांनी अँटी-कोविड नॅनोबॉडीजचा प्रयोग हॅमस्टर नावाच्या प्राण्यावर करून पाहिला आहे. हॅमस्टर उंदरांच्या प्रजातीमधील एक जीव आहे. नव्या उपचार पद्धतीत नॅनोबॉडीज एखाद्या मोनोक्लोनल एँटीबॉडीजसारखं काम करतात. नॅनोबॉडीजचा वापर कर्करोगावरील उपचारातही केला जातो. त्यांचा आकार अतिशय सूक्ष्म असतो. त्यामुळे त्यांच्या उत्पादनासाठी येणारा खर्चदेखील कमी असतो. जागतिक स्तरावर नॅनोबॉडीजचा वापर केला जाऊ शकतो. भविष्यात येणाऱ्या अनेक आजारांशी लढण्यातही नॅनोबॉडीज महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. सायन्स ऍडव्हान्सेस जर्नलनं २६ मे २०२१ रोजी या संशोधनाबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या