ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरात पुन्हा एकदा कोरोना महासाथीने उचल खाल्ली आहे. देशात त्यास तिसरी लाट असे संबोधले जात आहे. मात्र, हाच ओमायक्रॉन व्हेरिएंट कोरोनाची तीव्रता घटवणार असल्याचे एका अभ्यासात निदर्शनास आले आहे.संशोधकांचा अभ्यासद. आफ्रिकेतील संशोधकांनी ओमायक्रॉन व्हेरिएंटचा अभ्यास केला.नोव्हेबर आणि डिसेंबर या महिन्यांत आढळून आलेल्या २३ ओमायक्रॉनबाधितांच्या रक्ताचे नमुने संशोधकांनी अभ्यासले.संशोधकांनी बाधितांच्या रक्तद्रव्याची (ब्लड प्लाझ्मा) तपासणी केली.अंतिम निष्कर्षओमायक्रॉनने डेल्टाची जागा घेतल्यास कोरोनाच्या संसर्गाचा वेग कमी होईल. डेल्टापेक्षा ओमायक्रॉन कैकपटींनी सौम्य असल्याने कोरोनाची तीव्रता घटत जाईल.कोरोनाची तीव्रता घटल्याने संसर्गदरही कमी होईल. साथीचा अंताकडे प्रवास सुरू होईल.ओमायक्रॉनमुळे नजीकच्या काळात कोरोना कमी विघातक होऊन सामान्य आजार ठरेल.
CoronaVirus News: कोरोना संपणार? ओमायक्रॉनमुळे येत्या काळातील तीव्रता घटणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 6:05 AM