शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

CoronaVirus News : पल्स ऑक्सिमीटरचा वापर कसा करतात, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 4:05 AM

होम आयसोलेशनमधील व्यक्तीला स्वत:च्या शरीरातील आॅक्सिजनची पातळी घरच्या घरी मोजण्यासाठी पल्स ऑक्सिमीटरचा उपयोग होऊ शकतो.

- डॉ. अमोल अन्नदातेशरीरातील ऑक्सिजनची पातळी व हृदयाचे ठोके मोजण्यासाठी वापरण्यात येणारी वैद्यकीय उपकरण म्हणजे पल्स आॅक्सिमीटर. लक्षणविरहीत तसेच सौम्य व मध्यम लक्षणे असणाऱ्या होम आयसोलेशनमधील व्यक्तीला स्वत:च्या शरीरातील आॅक्सिजनची पातळी घरच्या घरी मोजण्यासाठी पल्स ऑक्सिमीटरचा उपयोग होऊ शकतो.कोरोना रुग्णाला ऑक्सिजनची पातळी मोजणे का गरजेचे असते ?कोरोनामध्ये श्वास घेण्यास त्रास सुरु होण्या आधी कमी झालेल्या ऑक्सिजनवरून न्यूमोनिया किंवा ऑक्सिजन कमी करणाºया इतर गुंतागुंतीचे निदान करता येते.नॉर्मल ऑक्सिजनची पातळी किती असते?सहसा ९४-१०० ही नॉर्मल ऑक्सिजनची पातळी असते. कधी ९३ पर्यंतही चालते. पण ९० च्या खाली मात्र तातडीने रुग्णालयात जायला हवे.रीडिंग कशी बघावी ?पल्स ऑक्सिमीटर हृदयाचे ठोके व ऑक्सिजनची पातळी अशा दोन्ही रीडिंग दाखवते. ऑक्सिजन दाखवले जाते तिथे रढड2 असे लिहिलेले असते. सहसा वर दाखवलेली रीडिंग आॅक्सिजनची असते आणि खाली दाखवलेली हृदयाच्या ठोक्याची असते. काही पल्सआॅक्समध्ये हे उलटे असू शकते व कुठली पातळी कशाची आहे हे मशिनच्या कव्हरवर लिहिलेले असते. पल्स आणल्यावर घरातील एक दोन स्वस्थ व्यक्तींना लावून बघावे. जिथे सगळ्यांची रीडिंग ९० च्या पुढे दिसते आहे ती आॅक्सिजनची पातळी दाखवणारी रीडिंग आहे हे मार्क करून घ्यावे. हे नीट समजून घेण्याचे कारण म्हणजे हृदयाचे ठोके ही आॅक्सिजनची पातळी समजून रुग्ण घाबरून जातात. रीडिंग दाखवण्यासाठी किमान ३० सेकंद लागतात.पल्स आॅक्सिमीटर लावण्याआधी बोटे तळहातावर चोळून गरमकरून घ्यावे.आॅक्सिजनची पातळीकमी दाखवत असेल तर ?आॅक्सिजनची पातळी कमी दाखवली तरी दर वेळी ती बरोबर असेल असे नाही. व्यक्ती नॉर्मल , स्वस्थ असताना ही पातळीकमी दाखवण्याची खालीलकरणे असू शकतात -मशिन बोटाला नीट लावलेले नसेल.हाताला मेंदी / नखाला नेल पॉलिश लावलेले असेल.हात थंड असतील.शरीरात लिपिड - चरबीचे प्रमाण जास्त असणे.नख मोठे असल्याने पल्सआॅक्स बोटावर नीट न बसने.खोलीतील जास्त प्रमाणात असलेला प्रकाश / सूर्यप्रकाश पल्सआॅक्सच्या लाईटशी ढवळाढवळ करत असणे.म्हणून आॅक्सिजन कमीदाखवले तर लगेच घाबरूनजाऊ नये व मशिन योग्यरित्या काम करते आहे का, हे तपासून पाहावे.घरात प्रत्येकाने पल्सआॅक्सविकत घ्यावे का ?प्रत्येकाने घरोघरी विकत घेण्याची गरज नाही पण पूर्ण सोसायटीत सगळ्यांनी मिळून एखादे पल्सआॅक्स किंवा काहीकुटुंबांच्या ग्रुपने मिळून एखादे घेण्यास हरकत नाही. कारण सगळ्यांना हे एकाच वेळी लागणार नाही.काहीही लक्षणे नसलेल्यांनाप्रतिबंध म्हणून रोज पल्सआॅक्सने आॅक्सिजनची पातळी तपासावी का ?याची मुळीच गरज नाही आणि याचा वापर फक्त कोरोना संसर्ग झाल्यावरच करावा.स्मार्टफोनमध्ये अ‍ॅपमध्ये आॅक्सिजनची पातळी मोजावी का ?फोनमधील आॅक्सिजनची पातळी दाखवणारे अ‍ॅप हे सदोष आहेत व त्यामुळे चुकीची पातळी दाखवण्याचे प्रमाण आहे म्हणून शक्यतो हे अ‍ॅप वापरू नये .एकापेक्षा जास्त जण वापरणार असेल तर पल्स आॅक्सिमीटीर सॅनिटायजरने क्लीन करून घ्यावे.(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस